Agriculture news in Marathi, Rainfall in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९) संततधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीर, घोड, नाझरे, उजनी, भामा आसखेड या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेले सोयाबीन, मका, बाजरीसह, भुईमूग, बटाटा, फुलशेती भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९) संततधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वीर, घोड, नाझरे, उजनी, भामा आसखेड या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेले सोयाबीन, मका, बाजरीसह, भुईमूग, बटाटा, फुलशेती भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठे नुकसान होणार आहे. 

परिपक्व होऊन, कापणीच्या स्थितीत असलेला भातपिके आणि काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. मावळ तालुक्यात संततधार पावसाला सुरवात झाली असून, भाताचे नुकसान झाले आहे. वेळेवर व योग्य पाऊस झाल्याने भाताचे पीक चांगले आले. त्यामुळे नेहमीपेक्षा उत्पादन अधिक मिळणार अशी शेतकऱ्यांना खात्री होती. सध्या भात कापणीला आला असून, दिवाळीनंतर शेतकरी भात कापणीला सुरवात होणार आहे. पावसाने सर्व भात भिजल्याने जमिनीवर पडला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास भाताचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पावसाने फुलशेती व भाजीपाला या पिकाचेही नुकसान झाले. आंदर मावळ परिसरात शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शेतकऱ्यांनी भात कापलेली भाताची कडपे पावसात भिजून गेली आहे. तर काही शेतकऱ्यांची उभी पिके आडवी पडली आहे.

आंबेगाव, खेड, तालुक्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले. तर रब्बी कांद्याच्या लागवड आणि पूर्वमशागतीची कामे खोळंबली आहेत. इंदापूर तालुक्यातील भिगवण व परिसराला शुक्रवारी व शनिवारी पावसाने झोडपून काढले. इंदापूर तालुक्‍याला संपूर्ण पावसाळा संपत आला, तरीही पावसाची प्रतीक्षा होती. परंतु, पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे रब्बीच्या पिकांना फायदा होणार असल्याने तालुक्‍यातील शेतकरीवर्गामध्ये समाधान आहे. तर शेतामध्ये पाणी साचून, खरीप पिकांचे काही प्रमाणात नुकसानही झाले आहे. दौंड तालुक्‍यात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार, मध्यम ते हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : कोथरूड ३९, खडकवासला ८४, थेऊर ३२, खेड शिवापूर ५५, भोसरी ४६, चिंचवड ४२, पौड ४०, घोटावडे ३५, माले ३०, मुठा ३६, पिरंगुट ३८, भोर ५८, नसरापूर ८३, किकवी ७५, वेळू ४४, आंबवडे ६४, संगमनेर ७०, निरगुडघर ४२, वडगाव मावळ ४१, तळेगाव ३८, कार्ला ३५, वेल्हा ३०, पानशेत ४०, विंझर ३८, वाडा ३८, राजगुरुनगर ४०, कुडे ३७, आळंदी ५१, पारगाव ३७, वडगाव रसाई ३६, शिरूर ३०, बारामती ४५, माळेगाव ३५, वडगाव ३७, लोणी भापकर ४९, सुपा ३०, मोरगाव ४६, भिगवण ५८, लोणी ५२, निमगाव केतकी ३१, सणसर ४०, देऊळगाव राजे ३५, पाटस ४१, यवत ३७, केडगाव ४२, राहू ३०, वरवंड ३८, रावणगाव ४१, दौंड ३५, सासवड ६२, भिवडी ५९, जेजुरी ४४, परिंचे ३०, वाल्हे ६१.

वीर, उजनीतून पाच हजार क्युसेकने पाणी सोडले
पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोटामध्ये शनिवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण क्षेत्रात सर्वाधिक ८४, तर वीर धरण क्षेत्रात ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पाणी आल्याने, तसेच अनेक धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा असल्याने पाण्याची आवक वाढताच धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. रविवारी (ता. २०) वीर धरणातून ५ हजार २१२, उजनी ५ हजार, नाझरे १ हजार ५००, भामा आसखेड ५५३ क्युसेक वेगाने, तर कासारसाई धरणातून १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.

इतर बातम्या
शिवसेनेचा दावा; सत्तास्थापनेचा पेच कायममुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे...
संपूर्ण पीक कर्ज माफ करून पीकविमा सक्षम...नाशिक  : ‘नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
साखर निर्यातीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढकोल्हापूर : पावसाळी स्थितीमुळे निर्यात न होऊ...