वऱ्हाडात पावसाची विश्रांती; पेरण्यांना वेग

बुलडाणा ः तालुक्यात अतिवृष्टीने नदी-नाले शेतांमधून वाहिल्याने पिकत्या जमिनी अशा खरडल्या आहेत.
बुलडाणा ः तालुक्यात अतिवृष्टीने नदी-नाले शेतांमधून वाहिल्याने पिकत्या जमिनी अशा खरडल्या आहेत.

अकोला ः मागील २४ तासांत वऱ्हाडात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम जोमाने सुरू केले आहे. विदर्भात ५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात या भागात पावसाने जोमदार हजेरी दिली. प्रामुख्याने बुलडाणा जिल्हा, अकोल्यातील सातपुड्याला लागून असलेले तेल्हारा, अकोट हे तालुके पावसाने झोडपून काढले. या भागातील नदीनाले दुथडी भरून वाहिले. वऱ्हाडातील प्रमुख नदी असलेल्या पूर्णेलाही पूर आला. या पावसाने पेरणीच्या कामांना गती आलेली आहे. बाजारपेठेतील कृषी साहित्य खरेदीसाठीची उलाढाल वाढली.

अतिवृष्टीच्या नुकसानीची बुलडाण्यात खासदारांकडून पाहणी बुलडाणा जिल्ह्यात तर आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली होती. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी जमिनीही खरडून गेल्याच्या घटना आता समोर आल्या आहेत. या नुकसानीची जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील मौजे अंभोडा, हतेडी, तांदुळवाडी, कोलवड येथील नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, संजय गायकवाड, भोजराज पाटील, धीरज लिंगाडे, डॉ. मधुसूदन सावळे, लखन गाडेकर, बाजार समिती संचालक श्रीकांत पवार, राजू मुळे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याच्या सूचना खासदार जाधव यांनी तहसीलदारांना दिल्या.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com