Agriculture news in Marathi Rainfall in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची उघडीप

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

कोकणातील पावसाचा जोर ओसरला आहे. शुक्रवारी (ता. १६) उघडीप मिळाली असून भिजलेले भात मोकळ्या मैदानात सुकायला ठेवण्यासाठीची धडपडत जिल्ह्यात सगळीकडे सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसात वाया गेल्याने कोकणातील शेतकरी हताश झाला आहे.

रत्नागिरी : कोकणातील पावसाचा जोर ओसरला आहे. शुक्रवारी (ता. १६) उघडीप मिळाली असून भिजलेले भात मोकळ्या मैदानात सुकायला ठेवण्यासाठीची धडपडत जिल्ह्यात सगळीकडे सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पावसात वाया गेल्याने कोकणातील शेतकरी हताश झाला आहे.

कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. कृषी सहायकांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील अर्जुना, कोदवली नद्यांच्या, लांजामध्ये मुचकुंदी, रत्नागिरीत काजळी, बावनदी, संगमेश्वरला शास्त्री या नदीच्या किनारी भागातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी तालुक्यात रात्रीही पाऊस सुरूच होता. शुक्रवारी सकाळी उघडीप मिळाली असली तरीही ढगाळ वातावरण होते. पावसात भिजलेले भात मळ्यातून बाजूला काढण्याची धडपडत शेतकरी करत होते. कजरघाटी येथे बाळकृष्ण शिंदे यांनी ओलं झालेलं भात तसंच झोडायला सुरुवात केली. तीन महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्यामुळे शेतकऱ्यांनी अवस्था बिकट झाली आहे.  या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई,  हरचेरी, पोमेंडी, कजरघाटी,  सोमेश्वर, निवळी, कोंडवी,  बावनदी यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

नदीकिनारी असणारी भात शेती पूर्ण पाण्याखाली गेली वाहून गेली. विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अनेक अडथळ्याचा सामना करावा लागत आहे. टोल फ्री क्रमांक बीझी लागत असून एकावेळी एका शेतकऱ्याला माहिती देण्याचं बंधन असल्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

मेहनत वाया गेलीय, पण भिजलेले भात वाळवून सुकवायचं. त्यातून काहीच हाताला लागणार नाही. काही मिळणार नाही,  त्यापेक्षा भात झोडून कण्या मिळतील.
- बाळकृष्ण शिंदे, कजरघाटी शेतकरी

खूप शेतकरी अश्रू गाळत आहेत. या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी.
-  सुयोग उर्फ दादा दळी, चांदेराई, माजी सरपंच


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...