नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन

नाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. शुक्रवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. जिल्ह्यात एकूण ४३६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्यात विविध तालुक्यांतील भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, निफाड तालुक्यात पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. नंतर मात्र त्याने उघडीप घेतली. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते. सटाणा, मनमाड, सिन्नरच्या पूर्व पट्ट्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दातली, खोपडी, मुसळगाव, वावी, पांगरी या गावांमध्ये पावसामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. भाजीपाला पिकांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र राहिले.

निफाड तालुक्यात सुकेने, चांदोरी, पिंपल्स, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, दिक्षी, ओने, ओझर परिसरात सायंकाळी ८ ते ९ च्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाणी द्राक्ष बागांमध्ये तुंबले. त्यामुळे पावसाचे पाणी खळखळून वाहिले. सोयाबीन, टोमॅटो पिकांमध्ये पाणी तुंबले. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

मनमाड शहरात सुरवातीला हलक्या सरी पडल्या. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढला. चांदवड तालुक्यात सोग्रस, शिरसाने, आडगाव टप्पा, मंगरूळ, निमोण, भाटगाव, भरवीर, देवरगाव यासह पूर्व भागात पाऊस झाला. या पावसमुळे मका, सोयाबीन, टोमॅटो, पिकासाठी पाऊस झाल्याने आधार मिळाला. देवळा तालुक्यात डोंगरगाव, वासोळ, दहिवड, महालपाटणे, मेशी या पूर्व भागातील गावांत पाऊस झाल्याने पेरण्यांना जीवदान मिळणार आहे.

नाशिक शहरात हलक्या सरी बरसल्या. नाशिकरोड परिसरात सर्वप्रथम पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उपनगरांमध्ये चांगला पाऊस झाला. शहरातील नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, सिडको, पंचवटी, सातपूर या परिसरात जोरदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठादेखील खंडित झाला. 

तालुकानिहाय पाऊस (मिमी)

नाशिक ३३.२
इगतपुरी २१.०
दिंडोरी १४.०
पेठ ५.५
त्र्यंबकेश्वर  १८.०
मालेगाव  २८.०
नांदगाव ४.०
चांदवड ४१.०
कळवण २२.०
बागलाण १००.०
सुरगाणा १०.२
 देवळा ४६.२
निफाड ३६.४
सिन्नर ५७.०
येवला  ०.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com