सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर आणि जत तालुक्यात पावसाची रिमझिम होती. जिल्‍ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी (ता. १) सकाळपासून थांबून थांबून पाऊस पडत होता. शिराळा तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. तर चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत आटपाडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. रात्री पाऊस झाला. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होते. दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडल्या. वाफसा आल्यानंतर या तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी करण्याचे नियोजन शेतकरी करू लागला आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला प्रत्यक्ष सुरवात केली आहे.

शिराळा तालुक्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. या पावसात शेतकरी भात लागवड करत होते. काही ठिकाणी भात पिकात पाणी साचून राहिले होते. हा पाऊस भातवाढीस उपयुक्त ठरणार आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत दमदार पाऊस झाला. यामुळे सोयाबीन पिकासह ऊस पिकासाठी नवसंजीवनी मिळाली आहे. पाऊस नसल्याने उसाच्या लागवडी रखडल्या होत्या. या पावसाने पुढील आठवड्यात ऊस लागवडीस गती मिळेल. तसेच हळद लागवडीसाठी देखील शेतकरी नियोजन करू लागले आहे.

दुष्काळीपट्ट्यातील जत तालुक्यात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही. तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करतोय. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करू लागला आहे. पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकरी पुढे आलेले नाहीत. मोठा पाऊस झाला तरच या भागात पेरण्यासाठी शेतकरी पुढे येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com