सातारा जिल्ह्यात पावसाने दाणादाण

सातारा जिल्ह्यात पावसाने दाणादाण
सातारा जिल्ह्यात पावसाने दाणादाण

सातारा ः जिल्ह्यात मंगळवारी (ता. २२) बहुतांशी भागात पाऊस झाला असून पूर्वेकडील माण, फलटण या दुष्काळी तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे फळबागांचे नुकसान वाढ होत असल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठपर्यंत सरासरी ११.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

माण, कोरेगाव तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. जिल्ह्याचा पश्चिम भागात कऱ्हाड तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यात कमी अधिक पाऊस सुरू आहे. महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा या तालुक्यांतील सुरू असलेल्या पावसामुळे भात व स्ट्रॅाबेरी पिकांचे नुकसान सुरू आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतून पाण्याचे उफळे निघत आहे. एकूणच या पावसाने शेतातील सर्व कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.  

अतिपावसाने शेतकऱ्यांची गोड दिवाळी कडू होऊ लागली आहे. नेते, प्रशासन निवडणूक आणि निकाल व्यस्त असल्याने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही. जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक फलटण तालुक्यात पाऊस झाला आहे. यामुळे या तालुक्यात दिवसेंदिवस नुकसान वाढत आहे. 

जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान सुरू असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाला आलेले पीक डोळ्यांसमोर वाया जात असल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या सर्वाधिक सोयाबीन, बाजरी, ज्वारी, भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे. 

पावसामुळे पिके भुईसपाट अतिवृष्टी, तसेच पावसाने शेतकरी हवादिल झाले आहेत. पावसाने काढणीस आलेली पिके भूईसपाट झाली आहेत. काढणी झालेली पिके पावसाने भिजून कुजली आहेत, तर आणि काही ठिकाणी त्यांना मोड आले आहेत. पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन, भात, बाजरी, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॅाबेरी या पिकांना बसला आहे.

रब्बी हंगाम धोक्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पेरणी काळ पुढे जाऊ लागला आहे. पुढील काळात पाऊस थांबला नाही तर रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये सातारा ७.६७, जावळी १४.६३, पाटण ८.३६, कऱ्हाड ००, कोरेगाव १०.५६, खटाव ६.६३, माण १९.१४, फलटण २३.६७, खंडाळा १८.७०, वाई ९.१४, महाबळेश्वर ३०.१८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com