agriculture news in marathi, Rainfall in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पावसाची संततधार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २१) पावसाची सर्वदूर रिपरिप सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलसाठे होण्याच्यादृष्टीने आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणाकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरूच असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी ६३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २१) पावसाची सर्वदूर रिपरिप सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलसाठे होण्याच्यादृष्टीने आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणाकडून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरूच असल्याने उजनी धरणाची पाणीपातळी ६३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा सुरवात केली आहे. सध्या खरिपातील पिकांना या पावसाने दिलासा दिला आहे. विशेषतः सोयाबीन, तुरीला या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. मूग, उडीद, मटकी मात्र आता हातच्या गेल्या आहेत; पण उशिरा का होईना पावसाने सुरवात केल्याने समाधान आहे. सोमवारच्या दिवसभराच्या रिपरिपीनंतरही मंगळवारी पुन्हा पावसाने आपली रिपरिप कायम ठेवली. सकाळी सूर्यदर्शनही काहीसे उशिराच झाले; पण पुन्हा पावसाने सुरवात केली.
जिल्ह्यतील मोहोळ, बार्शी, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस असा सर्वदूर हा पाऊस पडत होता. पण त्यात जोर नव्हता. सध्या पावसामुळे शेतीची कामेही थांबली आहेत. पडणारा हा पाऊस आणखी मोठा हवा आहे, त्याशिवाय विहिरी आणि बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार नाही.
 
दरम्यान, पुणे जिल्ह्याकडील धरणातून येणारे पाणी अखंडपणे सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दुपारी उजनी धरणाची पाणी पातळी ६३ टक्‍क्‍यांपर्यंत पोचली. धरणाची एकूण पाणी पातळी ४९५.१० मीटरपर्यंत राहिली. धरणातील एकूण साठा २७५१.५१ दशलक्ष घनमीटर आणि त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ९५१.७० दशलक्षघनमीटर एवढा होता. दौंडकडील ३५२१६ क्‍युसेक इतका होता. तो आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे धरण लवकरच ७५ टक्‍क्‍यांपर्यंत जाणार आहे.

इतर बातम्या
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...