Agriculture news in marathi; Rainfall soybean, cotton crop hit in Buldana district with acoli | Agrowon

अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन, कापूस पिकाला फटका
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मोताळा या भागांत मंगळवारी (ता. २२) दुपारी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी झडीसारखा पाऊस पडत असल्याने शेतीतील कामांवर मोठा परिणाम झाला आहे.  

गेल्या तीन दिवसांपासून या भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. मंगळवारी दुपारी अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे, बोरगावमंजू भागांत जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. खामगावमध्ये दुपारी जोरदार पाऊस पडला. मोताळा तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी मेहकर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी दिली.

अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मोताळा या भागांत मंगळवारी (ता. २२) दुपारी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी झडीसारखा पाऊस पडत असल्याने शेतीतील कामांवर मोठा परिणाम झाला आहे.  

गेल्या तीन दिवसांपासून या भागात अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. मंगळवारी दुपारी अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे, बोरगावमंजू भागांत जोरदार पाऊस झाला. अकोट तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. खामगावमध्ये दुपारी जोरदार पाऊस पडला. मोताळा तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. सोमवारी मेहकर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी दिली.

या पावसामुळे बळिराजाची चिंता वाढली आहे. सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून वेचणीला आलेला कापूस झाडावरच ओला झाला आहे. मालाची प्रतवारी घसरणार असल्‍याने बाजारभावात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.

याआधीसुद्धा झालेल्‍या प्रचंड पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, नवरात्रोत्‍सवापासून पावसाने उसंत घेतली. त्‍यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. सध्या सोयाबीन पिकाची काढणी जोरात सुरू आहे. अशातच पुन्‍हा तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची सोंगणी करून ठेवली. परंतु, पाऊस सुरू झाल्‍याने शेतात पडून असलेले सोयाबीन भिजत आहेत. अनेक शेतात सोयाबीनच्‍या सुड्या ओल्या झाल्या असून मळणीचे काम रेंगाळले आहे. ज्वारी, कापूस पिकालाही फटका बसत आहे. 

प्री-मॉन्सून क्षेत्रातून कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. अनेकजण दसऱ्यानंतर कापसाचा मुहूर्त करतात. या पावसामुळे आता कापसाचा हंगाम लांबण्याच्या मार्गावर आहे. पहिला कापूस दर्जेदार समजला जातो.

मात्र, पावसाने हाच कापूस ओला होत आहे. ज्वारीचे पीकही आता दाणे परिपक्व होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना अतिरिक्त पावसाने कणसे काळी दिसू लागली आहेत. परिणामी, शेतकरी संकटात सापडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...