नगर जिल्ह्यामध्ये सरासरी ४२.९३ टक्के पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः यंदाचा पावसाळा सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला आहे, मात्र अजूनही बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. असे असले तरी जिल्ह्यामध्ये सरासरी ४२.९३ टक्के पाऊस झाला असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे. अकोले तालुक्‍यात सर्वाधिक ८०.४३ टक्के पाऊस झाला आहे. कर्जतची पावसाची आकडेवारी मात्र सर्वात कमी २० टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ५१.८५ टक्के पाऊस झाला होता.  

नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍यातील पश्‍चिम भाग वगळला तर अजूनही अन्य भागात पुरेसा पाऊस नाही. पेरण्या, कापूस लागवडीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरणी, कापूस लागवड केली असून जवळपास सरासरीच्या ९० टक्‍क्‍यांपर्यंत पेरणीचे क्षेत्र गेले आहे. असे असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्यांवरही चांगला पाऊस नसल्याने परिणाम झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४२.९३ टक्के पाऊस झाला आहेत. जिल्ह्याची सरासरी ४९७.४ मिमी असून आतापर्यंत २१३.५२ मिमी पाऊस झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

अकोले तालुक्‍यात पावसामुळे भंडारदरा भरले असून मुळा धरणात ५७, निळवंडे धरणात ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या अन्य भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून पाऊसच झाला नसल्याने पेरलेली पीकंदेखील अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. तालुका झालेला पाऊस (टक्के) : अकोले ः ८०.४३, संगमनेर ः ६९.४३, कोपरगाव ः ४७.७१, श्रीरामपूर ः ६४.९१, राहुरी ः ३६.६५, नेवासा ः २७.८६, राहाता ः ४०.२१, नगर ः २६.१३, शेवगाव ः ४७.९६, पाथर्डी ः ३१.४१, पारनेर ः ३३.५५, कर्जत ः २०.५०, श्रीगोंदा ः ३५.४४, जामखेड ः ४५.५३.

सोळा मंडळात अल्प पाऊस जिल्ह्यामध्ये असलेल्या ९७ महसूल मंडळापैकी पेडगाव, काष्टी, देवदैठण, मांडवगण, माही जळगाव, मिरजगाव, पुणतांबा, कुकाणा, कापूरवाडी, वाळकी, बोधेगाव, चापडगाव, एरंडगाव, वाडेगव्हाण, तळेगाव, िंपपरणे या सोळा महसूल मंडळात १०० मिमीपेक्षा अल्प पाऊस झाला आहे. वाडेगव्हाणला सर्वाधिक कमी पाऊस आहे. सुरेगाव, साकीरवाडी, शेंडी, राजूर, अकोले, डोळासणे, अंदिरगाव, श्रीरामपूर महसूल मंडळात ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com