agriculture news in marathi, rainfall status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर दुष्काळाचे सावट

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने नुकसान झाले आहे. नाशिक, पुणे भागात झालेल्या दमदार पावसाने नगर जिल्ह्यातील काही भागांत पूर आला. मात्र, जिल्ह्यात पाऊस नसल्याने सुमारे दहा ते अकरा तालुक्यांवर यंदाही दुष्काळाचे सावट आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार सहा तालुक्यांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. 

नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने नुकसान झाले आहे. नाशिक, पुणे भागात झालेल्या दमदार पावसाने नगर जिल्ह्यातील काही भागांत पूर आला. मात्र, जिल्ह्यात पाऊस नसल्याने सुमारे दहा ते अकरा तालुक्यांवर यंदाही दुष्काळाचे सावट आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार सहा तालुक्यांत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. 

आठ तालुक्यांत पन्नास मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद असली, तरी त्यातील चार तालुक्यांत पाणी प्रश्न गंभीर आहे. अजूनही काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर खरिपाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त पाऊस झाल्याची प्रशासनाची नोंद आहे.  
पुणे, नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसाने भीमा, गोदावरी नदीला पूर आला. त्याचा फटका नगर जिल्ह्यामधील अनेक गावांना बसला. अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरण भरले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दिलासा मिळाला. मात्र, अकोले आणि संगमनेरचा काही भाग वगळला, तर अजूनही जोरदार पाऊस नाही.

धरणे भरल्याने लाभक्षेत्रातील गावांत समाधान व्यक्त केले जात असले, तरी सुमारे ९०० ते १००० गावांवर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. मध्यंतरी झालेल्या अल्प पावसावर खरिपाची पेरणी केली. त्यामुळे पेरणीची टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त दिसत असली, तरी पेरलेली पिके पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडदाची पिके आता मार्गी लागली असली तरी सोयाबीन, तूर, कापूस आणि बाजरी पाण्याअभावी धोक्यात आलेली असून, विहिरी व अन्य स्रोतांमध्ये पाणी नाही. पाऊस नसल्याने जमिनीतही ओलावा नाही. त्यामुळे अजून काही दिवस पाऊस आला नाही, तर पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाले तर गत वर्षीपेक्षाही यंदा गंभीर स्थिती निर्माण होईल. त्यामुळे सध्या तरी शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहेत.
 
शनिवारपर्यंत तालुकानिहाय पावसाची टक्केवारी (कंसात गत वर्षीची टक्केवारी) ः अकोले ः २०१.७८ (८७.१२), संगमनेर ः ९१.९३ (७१.७३), कोपरगाव ः ८९.०५ (४९.९८), श्रीरामपूर ः ४९.५९ (६५.९७), राहुरी ः ५२.७८ (३७.०६), नेवासा ः ६१.१७ (२७.८६), राहाता ः ५५.०९ (४०.२१), नगर ः ४९.२१ (२६.७०), शेवगाव ः ३५.७० (५०.०९), पाथर्डी ः ३७.२२ (३१.९५), पारनेर ः ५६.५५ (३७.१४), कर्जत ः २८.७१ (२०.५०), श्रीगोंदा ः ६४.६५ (३६.११), जामखेड ः ४१.७४ (५०.६४).


इतर ताज्या घडामोडी
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...