पुणे जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) सर्वदूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मावळातील तळेगाव दाभाडे येथे सर्वाधिक ८३ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी (ता. २४) दिवसभर हवामान अंशतः ढगाळ होते. 

गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. सोमवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. काही वेळ उन्हाचा चटका वाढल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

पुणे शहरातही जोरदार पाऊस झाला. पुणे शहरात सर्वाधिक ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली. केशवनगर येथे १७, कोथरूड येथे १३, खडकवासला येथे १३, थेऊर येथे ३३, उरुळी कांचन येथे १५, भोसरी येथे १५, चिंचवड येथे १४, कळस येथे १४, हडपसर, वाघोली येथे ३५ मिमी पावसाची नोंद झाली. मुळशीतील घोटावडे येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. पौड, थेरगाव, माले, मुठा, पिरंगुट येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. भोरमधील वेळू येथे ४२ मिमी पाऊस झाला. भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, संगमनेर, निगुडघर येथेही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.  

मावळ तालुक्यातील मावळ येथे ३३, खडकाळा येथे २३ मिमी पाऊस झाला. काळे कॉलनी, कार्ला, लोणावळा, शिवणे येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जुन्नरमधील राजूर येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली. नारायणगाव, डिंगोरे, आपटाळे येथे हलका पाऊस झाला. खेडमधील आळंदी येथे ४९, कन्हेरसर येथे ४२, चाकण येथे २३ मिमी पाऊस पडला. राजगुरुनगर, पाईट, शेळपिंपळगाव, कडूस येथेही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

आंबेगावमधील आंबेगाव, डिंभे, कळंब, पारगाव, मंचर येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शिरूरमधील रांजणगाव येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली. टाकळी येथे १३, न्हावरे, मलठण येथे १०, पाबळ येथे ३१ मिमी पाऊस पडला. बारामतीतील माळेगाव येथे २७ मिमी पाऊस झाला. बारामती, पणदरे, वडगाव, मोरगाव, उंडवडी येथे तुरळक स्वरूपाच्या सरी पडल्या. भिगवणमधील बावडा येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली. इंदापूर, लोणी, काटी, निमगाव केतकी, अंथुर्णे, सणसर येथे हलका पाऊस झाला. दौंडमधील यवत येथे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com