Agriculture news in marathi, Rainfall stop in the eastern part of Jat taluka | Agrowon

जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दडी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख, दरीबडची, माडग्याळ, जाडरबोबलाद उटगी यांसह २१ गावांत परतीच्या पावसाने दडी मारली आहे. या भागातील पाणीटंचाई आणि चाराटंचाई दिवसेंदिवस वाढली आहे. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत गेली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख, दरीबडची, माडग्याळ, जाडरबोबलाद उटगी यांसह २१ गावांत परतीच्या पावसाने दडी मारली आहे. या भागातील पाणीटंचाई आणि चाराटंचाई दिवसेंदिवस वाढली आहे. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटांपर्यंत गेली आहे. या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

पूर्व भागातील संख, दरीबडची, माडग्याळ, जाडरबोबलाद, उटगी, लमाणतांडा, सोन्याळ, खैराव, टोणेवाडी, मायथळ, व्हसपेट, आसंगी, गोंधळेवाडी, तिल्याळ, कुलाळवाडी, राजोबाचीवाडी यासह अनेक गावांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मोठा पाऊस झाला नसल्याने दिवसेंदिवस टंचाई वाढू लागली आहे. 
गावातील विहिरी, बंधारे तलाव कोरडे पडले आहेत. कुपनलिकेतील पाणी पातळी कमालीची घटली आहे. सध्या गावात पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. परंतु, शेतीला पाणी नसल्याने पाणी कोठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. सुरवातीपासून पाऊस नसल्याने खरीप वाया गेलाच आहे. आता त्यापाठोपाठ रब्बीही वाया जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या भागातील सुमारे चार ते पाच गावांना पाणीपुरवठा करणारा दरीबडची तलाव कोरडाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. 

द्राक्ष बागा संकटात

पूर्व भागातील सिद्धनाथ, जालिहाळ खर्दु या दोन गावांत एक हजार एकर द्राक्षाचे क्षेत्र आहे. याच ठिकाणी दर्जेदार बेदाणा तयार केला जातो. ऑक्टोबर महिन्यात छाटणी केली जाते. परंतु, पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणी लांबणीवर गेली आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर

शेती व्यवसायाबरोबर शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करत आहेत. परंतु, पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी चारा पिकाची पेरणी केली नाही. त्यामुळे दुधाच्या संकलनात घट झाली आहे. शेतकरी वाळका चारा, रानातील खुरटे गवत घालून जनावरांचा सांभाळ करत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचा रब्बी हंगाम दीड लाख हेक्टरवर...अकोला  ः खरिपात पिकांचे नुकसान झाल्याने काही...
सोलापूर जिल्ह्यात नुकसानभरपाईसाठी २०४...सोलापूर : यंदा ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या...
पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे...पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ...
अमरावती जिल्ह्यात ज्वारी ठरेल रब्बीत...अमरावती  ः मध्यम जमीन व सिंचनाच्या सोयी...
साहेब, संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न सोडवा...नागपूर ः ‘‘दुचाकी, कार आणि घर घेण्यासाठी कर्जाचे...
परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायमपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
सातारा जिल्ह्यात भूजल पातळीत वाढसातारा ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी,...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप...
कोल्हापूरच्या पूर्वेकडच्या भागात...कोल्हापूर : एकेकाळी सोयाबीनच्या उत्पादनात अग्रेसर...
ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडूंचे...मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घटपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा सांगलीतसांगली : आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप...
परभणीत शेतकरी संघर्ष समितीचे रास्ता...परभणी ः जिल्ह्यात मॉन्सुनोत्तर पाऊस आणि...
पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा कंपनीसमोर...पुणे ः मागील २०१८ या वर्षातील बीड जिल्ह्यातील...
पंतप्रधान मोदी आणि शिवसेनेत दरी निर्माण...मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना...
राज्यात लसूण ४२०० ते २० हजार रूपये...सांगलीत ४२०० ते १५००० रुपये सांगली : येथील...
राजकीय अस्थिरतेमुळे पूरग्रस्तांना मदतीस...कोल्हापूर: महापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या...बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘...अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी...
शरद पवार करणार विदर्भातील पीक नुकसानीची...नागपूर ः राज्यात सत्तास्थापनेचे गुऱ्हाळ सुरू...