सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम
सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस सुरूच असून किनारपट्टीला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. दरम्यान पुराच्या पाण्यातून वाहून जाणाऱ्या पिता-पुत्राला देवगड येथे वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज चौथ्या दिवशी कायम आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत किनारपट्टीच्या गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वेंगुलो, मालवण, देवगड, सांवतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील जनजीवन पावसामुळे विस्कळित झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती आहे. अनेक पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

देवगड तालुक्यातील बापर्डे येथील एका नाल्यावरील पाण्याचा अदांज न आल्याने एक दुचाकीस्वार व त्याचा लहान मुलगा वाहून जात होते. स्थानिक ग्रामस्थांनी त्या दोघांचे जीव वाचविले. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. वेंगुर्ला तालुक्याला देखील मुसळधार पावसासह वादळाचा तडाखा बसला. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. देवगड, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण या चार तालुक्यांत १०० मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी पाऊत ९०.६० इतका झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com