नाशिकला पावसामुळे महावितरणचे नुकसान, वीजपुरवठा पूर्ववत

नाशिकला पावसामुळे महावितरणचे नुकसान, वीजपुरवठा पूर्ववत
नाशिकला पावसामुळे महावितरणचे नुकसान, वीजपुरवठा पूर्ववत

नाशिक : पावसाच्या संततधारेमुळे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी महावितरणची विद्युत यंत्रणासुद्धा पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. काही भागांत सावधगिरीचा उपाय म्हणून विद्युत यंत्रणा पूर्ण व अंशता बंद करण्यात आली होती. यामध्ये महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील बंद पुरवठा दुसऱ्या भागातून जोडणी देऊन पूर्ववत झाला असून, फक्त जी यंत्रणा पाण्याखाली असल्यामुळे दुरुस्त करणे अवघड आहे, असा भाग सोडून इतरत्र पुरवठा सुरू झाला आहे. नाशिक शहर विभाग १ अंतर्गत पंचवटी परिसरातील मोदकेश्वर तसेच मच्छी बाजारातील, देवी मंदिरासमोरील पाण्यात असल्यामुळे फक्त ३ रोहित्रे बंद असून उर्वरित सर्व भागाचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या शहरातील जवळपास सर्वच वीजपुरवठा सुरू असून यामध्ये नदीकाठावरील ११ केव्ही धामणगाव व जायगाव या दोन वाहिन्या पाण्यामुळे बंद असून नायगाव, जाखोरी, जोगलटेंभे व बेलतगव्हाण तसेच नांदूर, जानूर, शिंदे पळसे, ब्राम्हणगाव या परिसरातील नदीकाठचे रोहित्र बंद आहेत. गंगापूर धरण परिसर, गिरनारे परिसरातील लाडाची वाहिनीचे खांब पडल्याने सदर भाग बंद आहे.  नाशिक ग्रामीण विभाग परिसरातील इगतपुरी उपविभागातील सांजेगाव ११ केव्ही वाहिनीचा खांब पडल्यामुळे सिरसाठ व कुशेगाव या गावातील वीजपुरवठा बंद आहे. पेठ उपविभागातील सिंदरी उच्च दाबाचा खांब पडला आहे. तसेच पाण्याखाली केबल असल्यामुळे सायखेडा येथील दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद आहेत. ३३ केव्हीचे दिक्षी उपकेंद्र येथील विद्युतपुरवठा बंद होता. मात्र, महावितरणकडून शुक्रवार (ता. ९) पासून पूर्ववत करण्यात आला आहे.  या पाऊस व पुरामुळे महावितरणचे एकूण उच्चदाबाचे १०६ खांब, लघू दाबाचे १७० खांब आणि ४६ रोहित्रांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, जनमित्र सातत्याने कार्यरत असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी विद्युत खांब, वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com