पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर

पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड तालुक्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने नद्या, नाल्यांना पूर आल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आंध्र, कासारसाई, वडीवळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमेच्या खोऱ्यातील पवना, मुळा-मुठा, इंद्रायणीसह अनेक नद्यांना पूर आल्याने उजनीच्या पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत लोणावळा येथे ३७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

भामा आसखेड (ता. खेड) धरणात ५८.४४ टक्के पाणीसाठा जमा झाला. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरण क्षेत्रात ११६ मिमी पावसाची नोंद झाली. धरणात एका दिवसात जवळपास एक टीएमसी पाणीसाठा वाढला. सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात गेले दोन ते तीन दिवस सारखाच पाऊस पडत असल्याने वेळनदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. मावळ तालुक्यातील संततधार पावसामुळे इंद्रायणीला पूर आला. वडिवळे धरण ९५ टक्के भरले. ४ हजार ७०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. आळंदीतील इंद्रायणीचे दोन्ही दगडी घाट सध्या पुराच्या पाण्याखाली आहेत. भक्ती सोपान पूल पूर्णपणे पाण्याखाली आहे. इंद्रायणीकाठाचे ज्ञानेश्वर मंदिर आणि काही धर्मशाळेच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.

मावळात शनिवारी (ता. २७) पावसाचा जोर वाढल्याने आढले, कासारसाई, पवना नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. पहाटे दोनच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला. त्यानंतरही मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे कासारसाई धरणाचा विसर्ग वाढविल्याने कासारसाई नदी सांगवडे गावाजवळ धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. आढले धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत असल्याने आढले नदीला पूर आला आहे. दारुंब्रे पुलाजवळ नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. 

पवना खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर आला. बेबडओहोळ पूल, गोडुंब्रे जुना पूल व साळुंब्रे साकव पाण्याखाली गेले आहेत. आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. भोर तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून नीरा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. 

शनिवारचा मंडळनिहाय पाऊस (मिमी) (स्रोत : महसूल विभाग) :

पौड १५५, घोटावडे १६५, थेरगाव १००, माले २०४, मुठा १७०, पिरंगुट १६१, भोर १२३, भोलावडे ९५, नसरापूर १२५, किकवी ६०, वेळू ७५, आंबवडे १२८, संगमनेर १०५, निगुडघर ११८, वडगाव मावळ १५८, तळेगाव १३५, काळे १७९, कार्ला २६५, खडकाळा १९८, लोणावळा ३७५, शिवणे ९६, वेल्हा १७८, पाणशेत १४५, विंझर १५३, आंबवणे १३१, राजूर १३०, आपटाळे ५५, वाडा ७२, राजगुरुनगर ६०, कुडे १९५, पाईट १४०, चाकण ७८, शेलपिंपळगाव ६४, कण्हेरसर ६७, कडूस ८८, घोडेगाव ५८, आंबेगाव (डिंभे) ९०, कुंभारवळण ५५.

धरण क्षेत्रातील पाऊस (मिमी) :

धरण पाऊस 
टेमघर १७० 
वरसगाव १४५
पानशेत १४७
खडकवासला ७६
पवना १७९
कासारसाई  १०९ 
मुळशी २०४
कळमोडी  १५०
चासकमान ८८
भामा आसखेड ११६
आंद्रा १५३
वडीवळे १९५
गुंजवणी १५८
भाटघर ५१
नीरा देवघर  ११८
वीर ३२
नाझरे
पिंपळगाव जोगा २६
माणिकडोह ५५
येडगाव  १२
वडज ४२ 
डिंभे ९० 
घोड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com