agriculture news in marathi, Rainfall in the west along Sangli | Agrowon

सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस 
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात चांगली हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, तर शिराळा, वाळवा आणि कडेगाव तालुक्‍यात मंगळवारी (ता. २५) जोरदार पाऊस पडला. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.

सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात चांगली हजेरी लावली आहे. रविवारी (ता. २३) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी, तर शिराळा, वाळवा आणि कडेगाव तालुक्‍यात मंगळवारी (ता. २५) जोरदार पाऊस पडला. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.

सांगली शहरात मंगळवारी पावसाने उघडीप दिली. नागज-रायेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे दुपारी एकच्या सुमारास सुमारे दीड तास पावसाने झोडपले. या पावसामुळे नागज येथील बंधारा तुडुंब भरला. जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २२) दमदार पावसाला सुरवात झाली. रविवारी सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत सोमवारी (ता. २४) सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. शिराळा, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्‍यांतील अनेक गावांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  

मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज व रायेवाडी येथे पाऊस संततधार सुरू होता. त्यामुळे नागज येथील बंधारा तुडुंब भरला आहे. ओढ्यातही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. रायेवाडी तलावात पाणी आले आहे. तेथील गाळ व मुरूम काढण्यात येत आहे.

गाळ पोकलॅंडच्या साह्याने उचलण्याचे काम सुरू होते. मात्र अचानक जोरदार आलेल्या पावसाने तलावात पाणी आले. पोकलॅंड पाण्यात बुडाले. ढालगाव व परिसरातील काही भागांतही पाऊस पडल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...