नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) दुपारनंतर संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधारेमुळे इगतपुरी तालुक्यात दारणा धरण पाणलोट क्षेत्रातील घोटी, इगतपुरी, भावली या परिसरात झालेल्या पावसामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे भात लागवडीच्या अवण्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते. नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी (ता. २६) सायंकाळनंतर संततधार सुरू होती. त्यामुळे गंगापूर धारणसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांत इगतपुरी व नाशिकमध्ये पावसाने दमदार वापसी केली आहे. त्यामुळे इगतपुरी येथे ८७, तर घोटी येथे ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे दारणा धरणात ८३ टक्के, तर भावली धरणात ९७ टक्के जलसाठा झाला आहे. पावसाचे पश्चिम भागात दमदार आगमन होत असले तरी कसमादे, पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.  शनिवार (ता. २७) अखेरीस इगतपुरी तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस मंडळ-पाऊस (मिमी) धारगाव १३२,  टाकेद ३८, वाडी वऱ्हे ५१, नांदगाव ५२, घोटी ४८, इगतपुरी १०५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com