राज्यात पावसाचा जोर वाढणार

काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Rainfall will increase in the state
Rainfall will increase in the state

पुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, गुणा, रांची, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता. २५) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या (ता. २२) कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, जोरदार वारे, मेघगर्जनेसह  पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर. मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना. विदर्भ : नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा. विदर्भ : गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com