Agriculture news in Marathi Rainfall will increase in the state | Agrowon

राज्यात पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २२) विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, गुणा, रांची, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्रापासून तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

कमी दाब क्षेत्राची निर्मिती
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत (ता. २५) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. उद्या (ता. २२) कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, जोरदार वारे, मेघगर्जनेसह 
पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर. मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना. विदर्भ : नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर.

विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा. विदर्भ : गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम.


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...