राज्यात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २६) कोकण मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Rainfall will increase in the state
Rainfall will increase in the state

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २६) कोकण मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, कोटा, संभळपूर, परादीप ते बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. २६) राज्यात सर्वच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :  विदर्भ : अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाडा तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) कोकण : संगमेश्‍वर, देवरूख प्रत्येकी २०, अंबरनाथ, वैभववाडी प्रत्येकी १०. मध्य महाराष्ट्र : रावेर ५०, कर्जत २०, बार्शी, पाचोरा, येवला प्रत्येकी १०. मराठवाडा : अंबड, धालेगाव, जळकोट प्रत्येकी ९०, उस्मानाबाद ७०, बदनापूर ६०, औरंगाबाद ३०, कन्नड, माहूर, मंथा, सोयगाव, उमरगा प्रत्येकी २०.  विदर्भ : जळगाव जामोद ३०, अंजनगाव, घाटंजी, गोरेगाव, खारंघा, परतवाडा, सालकेसा, सिरोंचा, झारी झामणी प्रत्येकी २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com