Agriculture news in Marathi Rainfall will increase in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २६) कोकण मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज (ता. २६) कोकण मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, कोटा, संभळपूर, परादीप ते बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीपर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. २६) राज्यात सर्वच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 
विदर्भ :
अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गडचिरोली.
शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाडा तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण : संगमेश्‍वर, देवरूख प्रत्येकी २०, अंबरनाथ, वैभववाडी प्रत्येकी १०.
मध्य महाराष्ट्र : रावेर ५०, कर्जत २०, बार्शी, पाचोरा, येवला प्रत्येकी १०.
मराठवाडा : अंबड, धालेगाव, जळकोट प्रत्येकी ९०, उस्मानाबाद ७०, बदनापूर ६०, औरंगाबाद ३०, कन्नड, माहूर, मंथा, सोयगाव, उमरगा प्रत्येकी २०. 
विदर्भ : जळगाव जामोद ३०, अंजनगाव, घाटंजी, गोरेगाव, खारंघा, परतवाडा, सालकेसा, सिरोंचा, झारी झामणी प्रत्येकी २०.


इतर बातम्या
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरुनांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
परभणी : सव्वा लाखावर पंचनामे प्रलंबित परभणी : जिल्ह्यातील पंतप्रधान पीकविमा...
हिंगोलीत सोयाबीनचे दर  ४६५० ते ४८५०...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
 कांदा दरात पुन्हा झाली घसरण नगर : दर मिळेल या आशेने गत वर्षीचा उन्हाळी,...
नागपुरात १९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यादरम्यान झालेली...
कांद्याचे भाव वाढल्यावरच  का पाडले...येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव वाढून...
पीक नुकसानी भरपाई मिळणार वाढीव दराने  येवला, जि. पुणे : निसर्गाच्या आपत्तीत अतिवृष्टी व...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...