Agriculture news in Marathi Rainfall will increase in Vidarbha | Page 3 ||| Agrowon

विदर्भात पावसाचा जोर वाढणार

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 जून 2021

येत्या दोन ते तीन दिवस कोकण, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः ढगाळ वातावरण आहे. कोकण व विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा असून, तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. येत्या दोन ते तीन दिवस कोकण, विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा काही प्रमाणात सक्रिय आहे. येते चार ते पाच दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण कोकण व विदर्भात पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात ढगाळ वातावरण असून, काही वेळा ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. बुधवारी (ता. १६) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाल्याने सकाळपासून उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमान कमीअधिक होत आहे. विदर्भात पावसामुळे तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात तापमान ३३ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात तापमान जवळपास सरासरीएवढे होते.

उत्तर भारतात मॉन्सून पुढे सरकेना
मॉन्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) अजूनही पुढे सरकलेले नाहीत. त्यामुळे राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना आणि दिल्ली भागांत अजूनही मॉन्सून दाखल झालेला नाही. येत्या चार ते पाच दिवसांत उत्तर प्रदेशाच्या काही भागांत पोषक वातावरण झाल्यानंतर मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. उत्तर भारतात वेगाने मजल मारलेला मॉन्सून मागील तीन दिवसांपासून रेंगाळलेला आहे. रविवारपासून मॉन्सून दीव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नाऊगाऊ, हमिरपूर, बाराबंकी, बरेली, शहारानपूर, अंबाला आणि अमृतसरच्या भागांतच आहे. बुधवारी उत्तर प्रदेश आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र होते. हे क्षेत्र बिहारच्या दिशेने सरकत असून, उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनचा प्रवास काहीसा मंदावला आहे. दोन दिवसांपासून राजस्थानचा वायव्य भाग ते बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग या दरम्यान असलेल्या पंजाब ते दक्षिण आसाम, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच पंजाब व परिसरात, राजस्थानाचा वायव्य भाग आणि हरियाना परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने मॉन्सूनमध्ये तीन ते चार दिवसांपासून प्रगती झालेली नाही.

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
गुरुवार ः
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  
शुक्रवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  
शनिवार ः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ  
रविवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ
 


इतर अॅग्रो विशेष
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी यापुढे...कोल्हापूर : सातत्याने निर्माण होणाऱ्या पूर...
दोष पीकविमा कंपन्यांचा, रोष आमच्यावर;...पुणे ः पीकविमा योजनेचे कंत्राट मिळवलेल्या खासगी...
दिवेकर, ताटेंसह १४ कृषी उपसंचालकांच्या...पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे...
मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर हलका...पुणे : राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी...
पीकविमा तक्रार निवारण व्यवस्थेचे तीन...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत समस्या किंवा...
यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या वीस यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात...
बावीस जिल्ह्यांत उभारणार तेलघाणे नागपूर ः विदर्भात तेलबियावर्गीय पिकांना...
सोयाबीन पिकाची किडीकडून चाळणआर्णी, जि. यवतमाळ : तालुक्यातील लोणी येथील...
‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनीतुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक...
लवांडे यांनी उभारली चारा पिकांची...फत्तेपूर (जि.. नगर) येथील अल्पभूधारक सोमेश्वर...
‘एफपीओं’ना बनवा अधिक कार्यक्षमशेतीसाठीच्या सध्याच्या अत्यंत प्रतिकूल अशा...
विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे...
नुकसानीच्या दोन लाखांहून अधिक सूचना...पुणे ः राज्यभर कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये...
विमा कंपन्यांच्या नफेखोरीला सरकारी...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेचा कारभार गेल्या...
राज्यात हलका, मध्यम पावसाची हजेरी पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने...
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा...मुंबई : महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची...
केबल शेडनेटला आता अनुदान पुणे ः राज्याच्या संरक्षित शेतीला चालना...
शेळीपालनापाठोपाठ घरालाही दिले ‘ॲग्रोवन...औरंगाबाद : शेतकऱ्याचं ‘ॲग्रोवन’वरचं प्रेम पुन्हा...
शेतकरी कंपन्यांसाठी २०० कॉपशॉप साकारणार पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना...
एकोप्याच्या बळावर बदलले वडगाव गुप्ताचे...दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या वडगाव गुप्ता (ता. जि....