तहानलेल्या उस्मानाबादमध्ये पाऊस बरसला

तहानलेल्या उस्मानाबादमध्ये पाऊस बरसला
तहानलेल्या उस्मानाबादमध्ये पाऊस बरसला

उस्मानाबाद / बीड : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १७१ मंडळांत बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, तुळजापूर व उमरगा तर बीड जिल्ह्यातील धारूर व माजलगाव तालुका पावसाच्या रडारवर होता. बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ९ मंडळांत ६५ ते १४० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. 

यंदाच्या पावसाळ्यात आजवर मराठवाड्यावर पावसाची अवकृपाच राहिली. परतीच्या उंबरठ्यावर असलेल्या पावसाकडून मराठवाड्यातील पाण्याविना कासावीस असलेली भूमी ओली झाली. दोन-तीन दिवसांपासून सार्वत्रिक नाही, परंतु वेगवेगळ्या भागांत पावसाने कृपादृष्टी दाखविली. मराठवाड्याची तहान काही भागांत भागविण्याचे काम केले. 

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४१ तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. लोहारा, तुळजापूर व उमरगा तालुक्यांत पावसाचा जोर मोठा होता. या तीनही तालुक्यांतील ८ मंडळात ८५ ते १४० मिलिमीटरदरम्यान पाऊस झाला. उस्मानाबाद शहर मंडळात ४४ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण ३३, केशेगाव २८, तुळजापूर ६२, सावरगाव ५९, मंगरूळ ६०, मुरूम ५५, मुळज ३६, मोहा ४३, तर गोविंदपुरात ३० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते २४ मिलिमीटर हजेरी लावली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४८ मंडळांत तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. शिरूर अनंतपाळ, औसा, चाकूर तालुक्‍यातील मंडळांत पावसाचा जोर अधिक राहिला. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. ते धारूर, माजलगाव तालुक्‍ंयात जोरदार बरसला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २५ मंडळांत पावसाची हजेरी लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी केवळ १२ मंडळांत पावसाची नोंद झाली. तुर्काबाद मंडळात सर्वाधिक २५ मिलिमीटर पाऊस झाला. फुलंब्री, कन्नड, खुल्ताबाद, वैजापूरसह औरंगाबाद, सिल्लोड, पैठण तालुक्‍यांतील काही ठिकाणी हलका पाऊस झाला. उर्वरित मंडळांत तुरळक नोंद झाली. 

पाच जिल्ह्यांतील जोरदार पावसाची मंडळे 

तेलगाव  ६५
नळदुर्ग ९२
सालगरा १४०
इटकळ  १३०
उमरगा ८८
डाळिंब  १०८
लोहारा १०७
माकणी ८५
जेवळी १०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com