Agriculture news in Marathi Rains accelerate paddy cultivation in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला वेग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जूनच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. परंतु काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाने दडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. आॅगस्ट महिना उजाडला तरी पाऊस न झाल्याने यावर्षी भात लागवड होणार की नाही याची चिंता भासू लागली होती. मात्र, तीन आॅगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या भात पट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस पडला.

विशेषतः धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीतही वाढ झाली. शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवडी करण्यास वेगाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जाते. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने भात पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामुळे आर्थिक प्रश्न उपस्थित राहिला होता.

यावर्षी पावसाने रोपवाटिका टाकल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. परंतु उशिराने का होईना पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. हाच पाऊस अजून लांबणीवर गेला असता तर भात पिकांचे व रोपांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना होती.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...