कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्वेकडील तालुक्यात ही मंगळवारी (ता. ४) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
Rains begin in Kolhapur district
Rains begin in Kolhapur district

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेष करून पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्वेकडील तालुक्यात ही मंगळवारी (ता. ४) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गगनबावडा तालुक्यात सुमारे १३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयनेतून ११३९ तर अलमट्टी धरणातून ६९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी, शिंगणापूर व रूई, भोगावती नदीवरील - खडक कोगे व वारणा नदीवरील-चिंचोली असे एकूण पाच बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन दिवसांत बहुतांशी धरणातून पुन्हा विसर्ग सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राधानगरी धरण क्षेत्रात संततधार राधानगरी तालुक्‍यातील तिन्ही धरण क्षेत्रांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणाची पातळी पाऊण फुटाने वाढली आहे. आजमितीस ५.७० टीएमसी म्हणजे ७० टक्के साठा झाला.

दाजीपूर परिसर व धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरुवात असून, अतिवृष्टीची नोंद झाली. ९३ मिलिमीटर इतका पाऊस २४ तासांत झाला असून, यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. राधानगरी येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राधानगरीसह दूधगंगा व तुळशी जलाशयांच्या पातळीत वाढ होत आहे.

धामोड येथील तुळशी जलाशय ५८ टक्के भरले आहे. सध्या ६०७.७५ मीटर इतकी पातळी असून, आजअखेर १११६ मि.मी. पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला आहे. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात २१७५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जलाशयाची ३.४७ टीएमसी क्षमता आहे. गतवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. जलाशयात ५८ टक्के साठा आहे. शेजारचा केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, उजव्या कालव्यातून विसर्ग तुळशी जलाशयात येत आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. ४) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस असा (कंसात १ जून पासूनचा एकूण पाऊस) ः हातकणंगले- ७.५० (२२८.८८), शिरोळ- ३.८६ (१९९.२९), पन्हाळा - ४९ (६६४.२९), शाहूवाडी- ४३.६७ (९४७. ८३), राधानगरी- ५५ (९५३.३३), गगनबावडा - १३७ (२६०४), करवीर- २९.०९ (४९५), कागल- ३९.८६ (६६३), गडहिंग्लज- २७.१४ (४८१.५७), भुदरगड- ३६ (७८४.२०), आजरा- ६२.७५ (१०७७.७५), चंदगड- ७२.५० (१०७७.८३)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com