परभणी, हिंगोलीत तहाणलेल्या पिकांना पावसामुळे दिलासा

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५९ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
 Rains bring relief to thirsty crops in Parbhani, Hingoli
Rains bring relief to thirsty crops in Parbhani, Hingoli

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५९ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता.११) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. खंडकाळात पाण्याचा ताण बसलेल्या भारी जमिनीवरील पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे. परंतु, अनेक मंडळात अद्याप पावसाचा खंड असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हलक्या जमिनीवरील वाळून गेलेल्या पिकांना आता पाऊस पडून उपयोग होणार नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील ३५ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. जिंतूर, पूर्णा, परभणी, पाथरी तालुक्यातील अनेक मंडळात काहीवेळ जोरदार पाऊस झाला. सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यातील अनेक मंडळांत, तसेच हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

अनेक मंडळात दीर्घ खंडानंतर पाऊस झाल्याने भारी जमिनीवरील पिकांना दिलासा मिळाला. परंतु, हलक्या जमिनीवरील पिके पावसाअभावी अकाली वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जोरदार पावसाअभावी हाती आलेली पिके वाया जाण्याचा धोका कायम आहे.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी) 

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण  ७.१, पेडगाव २३, जांब १४.५,पिंगळी ८,जिंतूर २६.५, बोरी २२.९, सावंगी ३०.५,  आडगाव ५२, पाथरी १५, गंगाखेड ६.८,पूर्णा ४६, ताडकळस १७.६, लिमला १७.६.  हिंगोली जिल्हा ः हिंगोली ५.३, माळहिवरा ६, कळमनुरी ५, वाकोडी ६.८, डोंगरकडा १४, हयातनगर १९, हट्टा ८.५, औंढा नागनाथ ५.५, साळणा ४१.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com