Agriculture news in Marathi Rains continue to fall in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाने दाणादाण सुरूच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस पडला आहे. यामुळे पेरणीयोग्य क्षेत्रातील पेरणी रखडली आहे. तसेच ज्वारी, वेचणीवरील कापूस या पिकांची नासाडी सुरूच आहे.

जळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस पडला आहे. यामुळे पेरणीयोग्य क्षेत्रातील पेरणी रखडली आहे. तसेच ज्वारी, वेचणीवरील कापूस या पिकांची नासाडी सुरूच आहे.

पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीनखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पूर्वमशागत सुरू केली होती. काही भागात ही मशागत पूर्ण झाली. कोरडवाहू ज्वारी, हरभऱ्याची पेरणी जळगाव, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात झालीदेखील आहे. काही शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली आहे. परंतु गेले दोन दिवस झालेला पाऊस व ढगाळ वातावरण यामुळे पेरणीचे काम रखडले आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरण गेले १० ते ११ दिवस कुठेही नाही. यामुळे शेतकरी पेरणी लांबणीवर टाकत आहेत.

गेले दोन दिवस खानदेशातील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव, एरंडोल, शिंदखेडा, शिरपूर, तळोदा, नवापूर या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे वेचणीवरील कापूस, कापणीवरील ज्वारीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मळणीसाठी सतत धावपळ सुरू आहे. सततच्या पावसाळी वातावरणामुळे शेतकरी संकटात आहेत. रब्बीची पेरणी केल्यास पुढे नुकसान  होवू शकते. कारण पेरणीनंतर पाऊस आल्यास बिजांकुरण व्यवस्थित होणार नाही, याची भीती शेतकऱ्यांना आहे.

गुरुवारी (ता. २२) रात्री जळगाव, चोपडा, धरणगाव भागात सुमारे १० ते १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला. या पावसाने उघड्यावरील पिके, जिनींग प्रेसिंग कारखान्यांमधील कापूस यांचे नुकसान झाले. कापसाला पोषक वातावरण नसल्याने बोंडे उमलत नसल्याची समस्या वाढली आहे. तसेच रोगराईदेखील आली आहे. या प्रतिकूल स्थितीमुळे शेतीकामे ठप्प होत असल्याचे चित्र खानदेशात आहे. पावसाळी वातावरण व प्रकल्पातील आवक सुरूच असल्याने जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा व वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...