Agriculture news in marathi Rains continue in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. रविवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांची स्थिती विदारक झाली आहे. त्यांची अवस्था शेतकऱ्यांना बघवत नसल्याची स्थिती आहे. 

पावसाने हाहाकार माजविला आहे. सोयाबीन सोबतच कपाशी, मका, आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या गावशिवारात पुराचे पाणी घुसल्याने अनेक ठिकाणी पीक व शेतजमिनी वाहून जाण्याचे प्रकारही घडले आहेत.

सततच्या पावसामुळे वापसा नाही. कापूस, मका, हंगाम लांबणीवर पडला आहे. अनेक शेतांमधून पाणी वाहत आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाऊस या पंचनाम्याच्या कामातही अडथळा ठरत आहे. 

सोयगाव मंडळात शिवारागणिक पावसाचं गणित बदलतं. पावसाचं गणित कसं लावलं जात असावं. शिवाय, पीकविम्याच्या परताव्यात कमीअधिक बरसणारा पाऊस कसा धरला जाईल, हा प्रश्न आहे.
- ईश्वर पाटील-सपकाळ, शेतकरी, तिडका, ता. सोयगाव


इतर अॅग्रो विशेष
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....