मराठवाड्यात पावसाचा जोर कायम

मराठवाड्यात बुधवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कायम राहिला. औरंगाबाद, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील ३९ मंडलात अतिवृष्टी झाली.
Rains continue in Marathwada
Rains continue in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कायम राहिला. औरंगाबाद, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील ३९ मंडलात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झालेल्या मंडलात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३४ मंडलांचा समावेश आहे.

पावसामुळे मराठवाड्यात बुधवारी सकाळपर्यंत दाणादाण सुरूच होती. नद्या, नाले धोक्‍याच्या पातळ्या ओलांडून वाहत होते. अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. प्रमंगळवारच्या तुलनेत लातूर, उसस्माबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुधवारी जोर थोडा ओसरला. औरंगाबाद जिल्ह्यातील ३४ मंडलात अतिवृष्टी झाली. तर सरासरी ६०.२ मिलिमिटर पाऊस नोंदला गेला. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४३.७ मिलिमीटर, जालना ३०.४ मिलिमीटर, नांदेड १९.२ मिलिमीटर, बीड १७ मिलिमीटर, परभणी १५.९ मिलिमीटर, उस्मानाबाद ५.५ मिलिमीटर, तर लातूर जिल्ह्यात सरासरी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टीची मंडळे (मिलिमीटरमध्ये) औरंगाबाद ः औरंगाबाद ७०, पिंपळवाडी ७४.२५, लोहगाव ७२.५०, बिडकीन ६५.२५, विहामांडवा ६७, गंगापूर ८९.७५, मांजरी ८३, भेंडाळा ७६.५०, शेंदुरवादा ९८.२५, तुर्काबाद ७२.२५, हर्सूल ८४.७५, डोणगाव ६७.७५,सिद्धनाथ वडगाव ८५.७५, वैजापूर ६५.२५, खंडाळा ९५.५०, शिऊर १०३.७५, बोरसर ९८, लोणी १२७.२५, गारज ७९.५०, महालगाव ९६, नागमठाण ९२, लाडगाव ८१.२५, कन्नड ७३.२५, चापानेर ७२, देवगाव ७१.५०, चिकलठाण ७५.७५, पिशोर ६८.२५, नाचनवेल ७६.७५, चिंचोली ८८.५०, करंजखेडा ८५.५०, वेरूळ ८१, आमठाणा ७६.२५, बोरगाव ७६.५०, बनोटी ७५.७५ जालना ः रामनगर ८०.५०, पाचनवडगाव ८१.५०,नांदेड  ः माळाकोळी ७२.५०,हिंगोली ः हिंगोली ६६.५०, खांबाळा ६६

शासनाच्या नियमानुसार अजून किती पाऊस पडायला पाहिजे? किती पिकांचे नुकसान झाले पाहिजे? म्हणजे नुकसान भरपाई मिळेल, हे तरी शासनाने स्पष्ट केले पाहिजे. - दीपक बुनगे, शेतकरी, रामगव्हान, ता. घनसावंगी, जि. जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com