मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरूच

राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भात अद्याप पाऊस सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला जोर आला आहे.
Rains continue in Marathwada, Central Maharashtra
Rains continue in Marathwada, Central Maharashtra

पुणे ः राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, विदर्भात अद्याप पाऊस सुरूच आहे. बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला जोर आला आहे. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत संततधार पाऊस सुरूच आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये ८२ मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे ६८ मिलिमीटर तर कोर्पणा येथे ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पावसामुळे राज्यभरातील विविध प्रकल्पांतून विसर्ग सुरू आहे. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ५५ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच बहुतांश धरणे तुडूंब भरली असून काहींची भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील जामखेड येथे सर्वाधिक ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कोपरगाव ३०, पारनेर ४२, धुळ्यात ३६ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप संकट कायम असून संततधार पाऊस मागील पंधरा दिवसांपासून सुरूच आहे. 

नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडून एक लाख ६५ हजार क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नदी दुथडी भरून पाहत आहे. तसेच पावसामुळे खरीप पिके सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर अशी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com