agriculture news in marathi Rains continue in Nanded district | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम वाढविला आहे. रविवारी (ता. ९) जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने तडाखा दिला.

नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम वाढविला आहे. रविवारी (ता. ९) जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने तडाखा दिला. मुदखेड तालुक्यातील मुगट येथे वीज पडून शेतात काम करणारी एक महिला ठार झाली. तर, अन्य तिघीजण जखमी झाल्या आहेत. 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पंधरा ते वीस दिवसांत अधूनमधून पूर्व मोसमी पाऊस हजेरी लावत आहे. शुक्रवारीही (ता. ७) जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला होता. यात फळे, पिकांचे नुकसान होत आहे. मुदखेड तालुक्यात रविवारी सकाळी वीजेचा कडकडाटासह पाऊस झाला. 

मुगट येथे  रेल्वे स्टेशनजवळील शेतात लक्ष्मीबाई वर्षेवार यांच्यासह इतर तीन महिला ज्वारी खुडण्याचे काम करत होत्या. पाऊस सुरु झाल्याने त्या लिंबाच्या झाडाखाली थांबल्या. या वेळी झाडावर वीज पडली. त्यामुळे लक्ष्मी बालाजी वर्षेवार (वय २५) यांचा मृत्यू झाला. तर, सोबतच्या इंदूबाई लोखंडे, रेणुका वर्षेवार, अर्चना मेटकर या तीन महिला जखमी झाल्या.

त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद मंडळात १७, तर मुगट ५.९, बारड ७.३, दाभड ७.३, देगलूर येथे ८ मि.मी पाऊस झाला.

‘बिलोलीत पंचनामे करून मदत द्या’ 

बिलोली तालुक्यात गुरुवारी (ता.६) खतगाव, केसराळी, आदमपूर, मुतन्याळ परिसरात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. मीनल खतगावकर यांनी निवेदनाद्वारे केली.

पावसाने काही घरे पडली, तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेले. काही गावात म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदी जनावरे दगावली आहेत. तसेच भुईमूग, तीळ, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले. तारा तुटल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे.


इतर बातम्या
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...