मराठवाड्यात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम

पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम
पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत २७२ मंडळांपैकी २५२ मंडळांत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला. सोमवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मंडळात ६८, तर लातूर जिल्ह्यातील खंडाळी मंडळात सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५३ मंडळांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, पैठण, गंगापूर, कन्नड, खुलताबाद तालुक्‍यांत पावसाचा जोर कमी राहिला. फुलंब्री मंडळात ६० मिलिमीटर, वडोदबाजार ५९, पैठण २५, विहामांडवा ३३, अमठाणा २४, भराडी ३०, गोळेगाव ४३, बोरगाव बाजार ४५, बनोटी ३६, सावलदबारा ४४, शिवूर २२, खंडाळा ३५, लोणी ४०,  मांजरी २५, चापानेर २२, चिंचोली लिंबाजी यथे ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला.  

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४२ मंडळांत पाऊस झाला. विरेगाव मंडळात ३४, पिंपळगाव रेणुकाई ४०, अनवा २५, जाफराबाद २०, टेंभूर्णी २७, कुंभारझरी ४०, परतूर २८, आष्टी ३६, वाटूर ३५, मंठा ३२, गोंदी २४, वडीगोद्री ६४, राणी उंचेगाव २३, तीर्थपुरीत २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात सर्वदूर तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. पिंपळनेर मंडळात २४ मिलिमीटर, म्हळसजवळा ३०, दासखेड २०, धामणगाव ५६, गेवराई २८, धोंडराई ४५, उमापूर २०, तलवाड २०, सिरसदेवी २८, वडवणी ४२, कौडगाव ३६, गंगामसला ३५, दिंद्रुड ३८, मोहखेड २७, परळी २२, नागापूर ४२, धर्मापुरी येथे २९ मिलिमीटर पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातही सर्वदूर हलका, तुरळक ते मध्यम पाऊस झाला. लातूर मंडळात २२, किल्लारी २४,  कारेपूर २२, अहमदपूर ४०, किनगाव ३२,  अंधारी ४२, निलंगा ३९, अंबूलगा बु. ३०, मदनसुरी ४०, वलांडी २५, बोरोळ मंडळात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वदूर पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद शहर मंडळात ३९, ढोकी ३१, तुळजापूर ३८, मंगरूळ ४३, सालगरा ३२, डाळींब २८, लोहारा ३०, माकणी २०, मोहा ३१, भूम ४१,  अंबी ३३, वाशी २९, तर तेरखेड्यात ४७ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळात हलका, तुरळक पाऊस नोंदला गेला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com