मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळ
निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुद्दुचेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.
चेन्नई ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुद्दुचेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये काल रात्रीपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.
राज्यपालांनी येथे बुधवारी आणि गुरुवारी (ता. २५) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून, सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले असून ते तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. या दरम्यान १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.
वादळ अतितीव्र होईल, तेव्हा वाऱ्याचा वेग प्रतितास १६५ किलोमीटरपर्यंत पोहोचेल, असे चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
वाहने रेल्वे पुलावर
चेन्नईत काल रात्रीपासून ११ सेंटिमीटर तर उपनगरात २० सेंटिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक निवासी भागांत पुराचे पाणी आले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वत्र पाणी असल्याने नागरिकांनी त्यांची वाहने रेल्वेच्या पुलावर उभी केली आहेत. गुरुवारीही (ता.२६) वेगवान वारे व मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी उद्याही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच कार्यालयात हजर राहू शकतील. दक्षिण-पश्चिम रेल्वेने उद्याच्या सात रेल्वे, तर विमान कंपन्यांनी चेन्नईला येणारी व जाणारी विमाने रद्द केली आहेत.