Agriculture News in Marathi Rains in East Vidarbha | Page 2 ||| Agrowon

पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाने हाहाकार उडाला. पावसामुळे अनेक गावांना जलाशयाच्या स्वरूप आले होते.

नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाने हाहाकार उडाला. पावसामुळे अनेक गावांना जलाशयाच्या स्वरूप आले होते. नदीकाठी असलेल्या शेतातील पिकांना देखील पुराचा फटका बसला. काही ठिकाणी पीक खरडून गेल्याने शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. 

बोलेरो नवीन हैदराबाद मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती, त्यानुसार सोमवारी (ता. २०) मध्यरात्रीपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. भिवापूर तालुक्यात २४ तासांत १२४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकाच वेळी बरसलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नांद नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील चिखलापार गावात तसेच शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तीन फुटांपेक्षा अधिक पाणी साचल्याने ग्रामस्थांच्या मनात धडकी भरली होती. गावातील अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने दैनंदिन उपयोगाच्या वस्तू भिजल्या. 

सध्या सोयाबीन हे पीक काढणीला आले असून जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांना आता ते काढणे शक्य नाही. कपाशीला देखील या पाण्याचा फटका बसला. शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान यामुळे झाले आहे. या परिसरात कपाशी सोबतच मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते या पिकांना देखील पावसाचा फटका बसला आहे. 


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...