जळगावच्या पूर्व भागात पावसाचा लहरीपणा

जळगाव ः जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्क्यांवर पाऊस झाला आहे; परंतु जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस अनियमित आहे. या भागात जूनमध्ये १२ दिवस पावसाचा खंड होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सुमारे पाच ते सहा दिवस पावसाचा खंड व उष्णता यामुळे पिकांची स्थिती नाजूकच आहे.
Rains in the eastern part of Jalgaon
Rains in the eastern part of Jalgaon

जळगाव ः जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्क्यांवर पाऊस झाला आहे; परंतु जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस अनियमित आहे. या भागात जूनमध्ये १२ दिवस पावसाचा खंड होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सुमारे पाच ते सहा दिवस पावसाचा खंड व उष्णता यामुळे पिकांची स्थिती नाजूकच आहे.

जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात बोदवड, भुसावळ, यावल, जळगाव आदी भाग आहे; तसेच जामनेर तालुक्यातील पूर्व भागालाही पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला. या भागात सोयाबीन पीक मोडण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली. कारण जूनमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आणि लागलीच पावसाचा खंड पडला. यात सोयबीनचे कोवळे कोंब होरपळले. त्यात एकरी तीन ते चार हजार रुपयांचे बियाणे, पेरणीचा खर्च वाया गेला. हा खर्च वाया गेल्यानंतर जूनच्या अखेरीस जो पाऊस झाला त्यावर पुन्हा पेरणी केली. नंतर शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मूग पेरणी केली; परंतु या पिकांवरही चांगला पाऊस झालेला नाही.

काळ्या कसदार जमिनीत पिकांची स्थिती तेवढी बरी आहे; परंतु हलक्या व मरमाड जमिनीत पिकांची स्थिती बिकट आहे. पावसाची प्रतीक्षा असून, पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. आता पिके वाया गेल्यास संबंधित क्षेत्र नापेर राहील. कारण शेतकरी तिसऱ्यांदा पेरणी करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे; तसेच कापूस, कडधान्य, ज्वारी पेरणीची मुदत संपत आली आहे. पुढे फक्त ताग, बाजरी, तुरीची पेरणी करता येईल. ही पिके परवडत नाहीत. यामुळे शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या भागात सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक मोडावे लागले आहे. सद्यःस्थितीत ज्वारी, कापूस या पिकांची अवस्था बिकट आहे. विशेषतः कुऱ्हा, नशिराबाद, भादली, आसोदा, नाडगाव, भालोद, बामणोद, शिरसोली आदी भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. रोज दुपारी उष्णता वाढते, ऊन पडते. उष्ण वाऱ्यांमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने घटला आहे. यामुळे पिकांची वाढ खुंटल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com