पावसाचा २७ हजार हेक्टरला फटका

नांदगाव तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २६ ते २७ हजार हेक्‍टरवर पिकांचे प्राथमिक नुकसान आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मका, बाजरी, खरीप कांदा भुईमूग यासह लेट खरीप कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
Rains hit 27,000 hectares crops
Rains hit 27,000 hectares crops

नाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २६ ते २७ हजार हेक्‍टरवर पिकांचे प्राथमिक नुकसान आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मका, बाजरी, खरीप कांदा भुईमूग यासह लेट खरीप कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागात नांदगाव तालुक्याला पावसाने चांगले झोडपले आहे. तालुक्यात १०० गावांतील ३२ हजार शेतकरी झालेल्या पावसामुळे बाधित झाले आहेत. त्यामध्ये जवळपास ५० कोटी रुपयांवर रुपयांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे.  

तालुक्यात कोसळलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहिले. नांदगाव महसूल मंडळात सर्वाधिक १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाने नांदगाव शहर व परिसराला वेढा घातला होता. पावसामुळे नदी नाल्यातून पाणी शेतात गेल्याने पिकांमध्ये पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी नाल्यालगत असलेली पिके वाहून गेली. तालुक्यातील महादेव डोंगररांगेच्या खालील भागातील पिंपरी हवेली, परधाडी, पिंपरी हवेली, न्यायडोंगरी परिसरातील गावांना अतिवृष्टीचा दणका बसला आहे. पर्जन्य नोंदीपेक्षा अधिक पाऊस या परिसरात झाला आहे. न्यायडोंगरीतील देश नदीस तर गेल्या चाळीस वर्षांत सर्वाधिक मोठ्या पुराची नोंद झाली आहे. पुराचे पाणी न्यायडोंगरी बाजारपेठेत घुसले, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. भालूर, मोरझर परिसरांत कांदा लागवडी वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर तालुक्यातील १० हेक्टर जमिनीवरील माती वाहून गेली आहे.

पिकाचे नुकसान कळविण्याचे आवाहन  तालुक्यातील १९ हजार खातेदारांनी पीकविमा काढला आहे. त्यांनी १० सप्टेंबरपर्यंत नुकसानीबाबत टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ वर ७२ तासांच्या आत सूचना नोंदवाव्यात. टोल फ्री नंबर लागत नसल्यास एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीचे तालुका प्रतिनिधी, तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे लेखी स्वरूपात सूचनापत्र द्यायचे आहे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com