Rains hit 43,000 hectares of crops in Nagar district
Rains hit 43,000 hectares of crops in Nagar district

नगर जिल्ह्यात पावसाचा ४३ हजार हेक्टर पिकांना फटका

​ नगरः जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांच्या काळात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.

नगर ः जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांच्या काळात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हाभरात साधारण २१६ गावांतील ६३ हजार शेतकऱ्यांच्या ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. १३ आक्टोबरपर्यंतचे हे नुकसान असून त्यानंतरही दोन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. 

नुकसानीचे पंचनामे सुरु असून अतिवृष्टीची नोंद झालेल्या मंडळांत पंचनामे केले जात आहेत. शेवगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात सलग वीस दिवस पाऊस झाला. त्यामुळे खरिपांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर चार- पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मागील आठवड्यात पाऊस झाला. विशेष करून शेवगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्यात ढगफुटीसदृष्य जोरदार पाऊस झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, आक्टोबर महिन्यात शेवगाव, पाथर्डी, कर्जत १३ तारखेपर्यंत तीन तालुक्यातील २१६ गावांतील ६३ हजार शेतकऱ्यांच्या ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यात ३३, कर्जत तालुक्यात ७०, तर शेवगाव तालुक्यात ११३ गावांना या अतिपावसाचा फटका बसला. यानंतरही १४ व १५ आक्टोबरला जिल्हाभरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नुकसानीचे क्षेत्र आणि पावसाने प्रभावित शेतकरी व गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. ३ आक्टोबरपर्यंत वरिष्ठ पातळीवर अहवाल मागितला होता. मात्र, १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही कृषी विभागाकडे अहवाल आलेला नाही. आताही ज्या भागात स्वयंचलित हवामान केंद्रातील नोंदीनुसार अतिवृष्टी (६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद) झाली आहे. त्याच महसुल मंडळांत पंचनामे केले जात आहेत.   लवकरात लवकर भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. मोठा आर्थिक फटका बसला आहे. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट पंचनामे करा. शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. - हरिभाऊ केसभट, राज्य समन्वय, शिवबा संघटना. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com