मेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर Rains hit Beed district again
मेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर Rains hit Beed district again

मेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर 

बीड जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच असून, सोमवार मध्यरात्री पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

बीड : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच असून, सोमवार मध्यरात्री पुन्हा जिल्ह्यात अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथे घडली. 

मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक भागांत गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. दोन दिवसांच्या खंडानंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा जोरदार मेघगर्जना सुरू झाल्या. विजांचाही कडकडाट सुरू होता. सकाळी दहावाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने लावलेल्या हजेरीने रब्बीचा काढून टाकलेला गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.  वीज पडून शेतकरी ठार  पारगाव घुमरा (ता. पाटोदा) येथे मंगळवारी सकाळी वीज पडून शेतकरी ठार झाला. शहाजी भुंजगराव भोसले (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शहाजी भोसले सोमवारी रात्री शेतामध्ये झोपण्यास गेले होते. रात्री विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यावेळी बाहेर बैलगाडीमध्ये झोपलेल्या शहाजी भोसले यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  ऊस तोडणीच्या कामातही व्यत्यय   जिल्ह्यात यंदा ऊसलागड मोठ्या प्रमाणात झाली. काही कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असला तरी काही सुरू आहेत. हजारो हेक्टर ऊस अद्यापही शेतात उभा आहे. मात्र, पावसामुळे चिखल झाल्याने तोडणी आणि वाहतूक करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ऊस तोडणीसाठी शेतांमध्ये कोप्या करून राहिलेल्या मजुरांच्या कोप्यांमध्येही पाणी शिरले.  ....   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com