agriculture news in marathi Rains hit crops in Devani taluka | Page 2 ||| Agrowon

देवणी तालुक्यात पिकांना पावसाचा तडाखा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जानेवारी 2021

देवणी, जि. लातूर : तालुक्यात बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिके आडवी झाली. तीन तास झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. 

देवणी, जि. लातूर : तालुक्यात बुधवारी (ता. ६) सायंकाळी सातनंतर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिके आडवी झाली. तीन तास झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. 

बुधवारी तालुक्यातील वलांडी महसूल मंडळात १०८, देवणी मंडळात ५०, तर बोरोळ मंडळात ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी ६३.६६ मि.मी पाऊस झाला. वलांडीसह कवठाळ, जवळगा, टाकळी, कोरेवाडी, धनेगाव भागात जोरदार वाऱ्याने ज्वारीचे पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत. सध्या उसाची तोड सुरू असून सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस तरी तोडणी झालेला ऊस फडाबाहेर निघणे कठीण झाले आहे. 

तालुक्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजासह बागायती पिकांची लागवड केली. अतिपावसाने सरीत पाणी थांबल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. सर्वच भागात तुरीची कापणी पूर्णत्वास आली आहे. पावसाने तुरीचे कापलेले पीक पाण्यात गेले आहे. वलाडी भागातील सर्वच ओढे, नाल्यांना पाणी आले. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने मर रोगाचा धोका निर्माण झाला. 

चालू हंगामात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे दोन एकर क्षेत्रावर टरबूज, एक एकर क्षेत्रावर खरबूज यांसह केळी, कोथिंबिरीची लागवड केली आहे. बुधवारी झालेल्या पावसाने खरबुजाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गुरुवारी दिवसभर मजूर लावून पाणी रानाबाहेर काढले. अतिपाण्यामुळे टरबूज, खरबूज पिकांना रोगाचा धोका आहे.
- सुरेंद्र आंबुलगे, वलांडी

तालुक्यात दक्षीण भागात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारीचे पीक पूर्णतः आडवे झाले आहे. शिवाय, तुरीच्या कापणी झालेल्या पिकात पाणी साचले. त्यामुळे पीक वाया जाणार आहे. हरभरा पिकामध्ये पाणी साचल्याने पिके पिवळी पडून मर रोगाची भीती आहे. 
- संभाजी पाटील, शेतकरी


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...