Agriculture news in Marathi Rains hit crops in Shirur taluka | Agrowon

शिरूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

सोमवारी (ता. ७) झालेल्या पावसाने शिरूर तालुक्याला चांगलेच झोडपले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मूग, उडीद नुकसान झाल्याची स्थिती आहे.

पुणे ः गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर सोमवारी (ता. ७) झालेल्या पावसाने शिरूर तालुक्याला चांगलेच झोडपले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे मूग, उडीद नुकसान झाल्याची स्थिती आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने अनेक ठिकाणी कडक उन्हासह सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे जिल्ह्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होत आहे. तर चार वाजेनंतर ढग भरून येत असून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून चांगलाच पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या झालेल्या पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणात ८० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला असून काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत शिरूर येथे ३४.५ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पश्चिम आणि उत्तरेकडील आठ तालुक्यांत पाऊस पडला आहे. यामध्ये प्रामुख्याने हवेली, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्याचा समावेश आहे. तर बारामती, इंदापूर, दौंड, मुळशी आणि पुरंदर तालुक्यात उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती होती. हवेलीतील खेड, भोरमधील वेळू, मावळमधील शिवणे, काले, तळेगाव, वेल्ह्यामधील विंझर, आंबावणे, जुन्नरमधील नारायणगाव, खेड मधील चाकण, घोडेगावमधील कळंब, शिरूरमधील न्हावरा, शिरूर परिसरात चांगलाच पाऊस झाला.  

मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः हवेली - खेड २२.८ , भोसरी ६.०, चिंचवड ६.५. भोर - वेळू २०.८, आंबवडे ११.५, निगुडघर १८.५. मावळ - वडगाव मावळ १३.८, तळेगाव २४.३, काले २८.८, कार्ला १९.८, लोणावळा २१.०, शिवणे ३१.३. वेल्हा - वेल्हा २०.५, पाणशेत १४.५, विंझर २४.३, अंबावणे २१.५. जुन्नर - जुन्नर १७.८, नारायणगाव २५.५, वडगाव आनंद १४.८, बेल्हा १९.५, राजूर, डिंगोरे १३.०, आपटाळे १०.३, ओतूर १०. खेड -  वाडा १३.८, राजगुरूनगर १७.३, कुडे १२.८, पाईट १४.०, चाकण २६.०, कन्हेरसर १७.०, कडूस १२.५. आंबेगाव - घोडेगाव १४.०, कळंब ३३.३, पारगाव १५.०, मंचर १२.३. शिरूर - टाकळी १४.८, न्हावरा १९.५, मलठण १६.०, तळेगाव ११.३, रांजणगाव १४.०, कोरेगाव ११.५, पाबळ १३.५, शिरूर ३४.५ पुरंदर - सासवड ११.३.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...