कोकण, मराठवाड्यात पावसाचा दणका

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असतानाच, शनिवारी (ता. ९) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने दणका दिला.
Rains hit Konkan, Marathwada
Rains hit Konkan, Marathwada

पुणे : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असतानाच, शनिवारी (ता. ९) सायंकाळनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने दणका दिला. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश, दुपारी उन्हाचा चटका, उकाडा वाढून, आकाशात गडगडाटी ढग गोळा होऊन जोरदार पावसाला सुरुवात होते. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाड होत असून, काही ठिकाणी वीज पडण्याच्या तसेच जोरदार वाऱ्यामुळे झाडपडीच्या घटना घडत आहेत. कमी काळात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत असल्याने काढणीस आलेल्या खरीपाच्या पिकांना फटका बसला आहे.

शनिवारी (ता. ९) दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पुणे, सोलापूर, नगर, सांगली, कोकणातील रायगड, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग)  कोकण : सुधागडपाली ८०, पोलादपूर ५०, भिवंडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला प्रत्येकी ४०, खालापूर, उल्हासनगर, विक्रमगड प्रत्येकी ३०. मध्य महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर ११०, माळशिरस, पुणे, श्रीरामपूर प्रत्येकी ८०, भोर, चिंचवड, कवठे मंहाकाळ प्रत्येकी ७०, तासगाव ६०, सांगोला ५०, बारामती, दिंडोरी, कडेगाव, खंडाळा, म्हाडा, पौड प्रत्येकी ४०, हर्सूल, जावळी मेढा, कराड, कर्जत, ओझरखेडा, पंढरपूर, संगमनेर, शिरोळ, वेल्हे प्रत्येकी ३०. मराठवाडा : रेणापूर ९०, कळंब ६०, शिरूर अनंतपाळ प्रत्येकी ४०, मुदखेड, परतूर, वाढवणी, वाशी प्रत्येकी ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com