कोल्हापुरातील बहुतांश तालुक्यांना पावसाचा दणका

कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पावसाने रविवारी (ता. ३१) दुपारी जिल्ह्यांतील बहुतांशी तालुक्याना दणका दिला. वाऱ्यासह आलेल्या जोरदार माॅन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यास झोडपले.
Rains hit most of the talukas in Kolhapur
Rains hit most of the talukas in Kolhapur

कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पावसाने रविवारी (ता. ३१) दुपारी जिल्ह्यांतील बहुतांशी तालुक्याना दणका दिला. वाऱ्यासह आलेल्या जोरदार माॅन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यास झोडपले. कोल्हापूर शहरासह करवीर, आजरा, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. राधानगरी व भुदरगड तालुक्यात काही ठिकाणी मध्यम तर इतरत्र तुरळक पाऊस झाला. हातकणंले व शिरोळ तालुक्यामध्ये पावसाने हुलकावणी दिली.

मे महिन्याच्या पूर्वार्धात जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता. या पार्श्वभूमीवर  शेतकऱ्यांनी शेत तयार करण्यास प्राधान्य दिले होते. आठ दिवसांपूर्वीच रोहिणी नक्षत्राच्या शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला होता. ज्या शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे त्यांच्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्ह्याच्या पूर्व भागात मशागतीस वेग येणार आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी पाऊल अनूकुल ठरला आहे. माॅन्सूनच्या आगमनापर्यंत पूर्व मोसमी पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्यामुळे खरिपाच्या उर्वरित पेरणीला गती येणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पाऊस ८ जूनपासून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी ८ जूनपर्यंत पूर्व माॅन्सून पाऊस पडणार असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरित पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी सरसावला आहे. शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड, राधानगरी आदी तालुक्यात भात रोपे करण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे भात व नाचना रोप तरवा टाकण्यासाठी गती येणार आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात अद्याप पेरणीपूर्व मशागत सुरू असून येत्या आठवड्याभरात पेरणीला गती येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com