Agriculture news in marathi Rains hit soybean crop in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला दणका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, सततच्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकांच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत.

परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, सततच्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकांच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीनचा घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ६८४ हेक्टर आहे. गेल्या वर्षापासून सोयाबीन हेच अनेक शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक झाले आहे. यंदा सोयाबीनचे पीक ७० ते ७२ दिवसांचे असताना पावसाचा दीर्घ खंड पडला. त्यामुळे  जमिनीतील ओलावा नष्ट झाला.

तापमानात वाढ झाली. परिणामी अकाली पाने पिवळी पडून पानगळ झाली. त्यात गेल्या पाच, सहा दिवसांपासून अनेक मंडळांमध्ये सतत जोरदार पाऊस सुरु आहे. पाथरी, मानवत, सेलू या तालुक्यातील अनेक मंडळामध्ये यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासून पावसाचे सातत्य आहे.

पूर्णा, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, सोनपेठ तालुक्यातील काही भागात सतत पाऊस आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळात ओढे, नाले, नद्यांचे पाणी शिरुन जमिनी खरडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या पिकांवरील शेंगा भिजल्याने मोड फुटले आहेत. सतत शेंगा भिजत असल्यामुळे दाणे डागील झाले आहेत. दाण्याची प्रत खराब झाल्यामुळे कमी बाजारभाव मिळून मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 

नुकसान आणखी वाढण्याची शक्यता

पाऊस थांबला नाही, तर नुकसानीचे आणखीनच प्रमाण वाढणार आहे. ऐन काढणीच्या वेळेस पाऊस सुरु असल्यामुळे मुगाच्या शेंगांना देखील झाडावरच मोड फुटले होते. त्याचप्रमाणे आता सोयाबीनची गत तशीच झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून महिन्यात पेरणी केलेले सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे. परंतु, सततच्या पावसामुळे शेंगांना मोड फुटून नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन मदत द्यावी.
- रमेश राऊत, मांडाखळी, जि. परभणी


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांनी केळी पीकविमा भरू नयेजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
सांगलीत रब्बीचा ३९ हजार हेक्टरवर पेरासांगली ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी...
मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी १७३४...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील पिकांच्या नुकसान...
रत्नागिरीतील पीक नुकसानीची भरपाई मिळेल...चिपळूण, जि. रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यात मागील...
शितादही करण्यापुरताही कापूस लागला नाहीअकोला ः शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली. कपाशीची...
परभणी जिल्ह्यात पीकविमा परताव्यासाठी ३१...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...
सीताफळ प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन...अकोला ः गेल्या काही वर्षात सीताफळ लागवडीकडे...
नगरमधील ६० गावांतील ७८ पाणी नमुने दूषितनगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांतील सप्टेंबर...
पुणे कृषी महाविद्यालयात आंदोलनपुणे ः सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महात्मा...
गोंदिया जिल्ह्यातील दोन संस्थांचा धान...गोंदिया : नियमबाह्यरीत्या धान खरेदी तसेच...
हिंगोली जिल्ह्यात तीन लाख ७ हजार...हिंगोली : जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे...
उत्पादन खर्चाच्या दुप्पट दराचे काय? ः...नाशिक : ‘‘केंद्र सरकारने कांदा...
सोलापूर जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्‍टर...सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात...
सोलापुरात महावितरण मुख्यालयाला ‘...सोलापूर : लॉकडाऊन काळातील शेतीचे संपूर्ण वीज बिल...
सोलापूर जिल्ह्यात तीस हजार शेतीपंपाच्या...सोलापूर :  अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे...
सेंद्रीय आणि शाश्‍वत शेती विकासासाठी ‘...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या...
कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा करू:...नाशिक: कांदा साठवणूक मर्यादा निर्णयाच्या संदर्भात...
डाळिंबातील बुरशीजन्य मर रोगाचे...फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या...
केळी पिकावरील मर रोगाचे व्यवस्थापनझाडावरील जुन्या पानांच्या देठाकडील तळभागी फिकट...
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्यसूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात मातीतून आणि...