पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्या

फुलोरा अवस्थेतील बागेत गळकुजीची समस्या आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
The rains increased the difficulties during the grape season
The rains increased the difficulties during the grape season

नाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे छाटण्या झालेल्या बागांना मोठा तडाखा बसला आहे. ज्या बागा छाटणीनंतर माल निघत आहे. अशा बागेत घड जिरण्याची समस्या वाढत आहे. तर फुलोरा अवस्थेतील बागेत गळकुजीची समस्या आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

द्राक्ष उत्पादक पट्ट्यात छाटणीनंतर सततचे मुसळधार पाऊस झाले. अशा भागात घड जिरण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर हंगामाच्या सुरुवातीलाच अडचणी वाढल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती व उत्पादन घेऊन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडलेली बाजारपेठ या समस्येमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच बहराच्या सुरुवातीलाच निविष्ठांचा व इंधन खर्च वाढल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे. 

चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाले, तेथे अडचणी वाढल्याची स्थिती आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत पाणी साचल्याने नत्राचे प्रमाण वाढल्याने बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मूळकूज होत असल्याने मुळांची कार्यक्षमता मंदावल्याने अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडचणी येत आहेत. परिणामी सुरुवातीला काही बागांमध्ये घड कमी निघण्याची समस्या आहे.छाटणीपश्चात १५ दिवसानंतरच्या बागेत घड जिरण्याची समस्या दिसून येत आहे. प्रामुख्याने निफाड, नाशिक, दिंडोरी, चांदवड भागात हे नुकसान वाढलेले आहे. त्याचा परिणाम आगामी उत्पन्नावर दिसून येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

कसमादे भागातील बागलाण तालुक्याच्या मोसम खोऱ्यातील आसखेडा, बिजोटे परिसरात पोंगा अवस्थेत घड जिरण्याची समस्या ऑगस्ट महिन्यात दिसून आली होती. तर आता उशिराच्या बागांमध्ये फुलोरा अवस्थेत गळकुज समस्या दिसून आलेली होती. जीवाणूजन्य करपा, डाउनी ही समस्या डोकेदुखी ठरत आहे.        कामात अडचणी; मजुरीही वाढली  अनेक भागांत पावसाचे पाणी साचून तर काही ठिकाणी अद्यापही वाफसा नाही. त्यामुळे फवारणी करण्यासाठी ट्रॅक्टर गल्ल्यांमधून नेता येत नसल्याने कामात अडचणी येत आहेत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर असल्याने मजूर गावाकडे सणासाठी परतत आहेत. त्यातच वाढलेला मजुरी खर्च आर्थिक कोंडी करणारा ठरत आहे. चालू वर्षी छाटण्या टप्प्याटप्प्याने सुरू होत्या. मात्र पावसामुळे त्यात व्यत्यय आल्याने पाऊस बंद होताच  छाटणीच्या कामांची पुन्हा एकत्रित गर्दी झाल्याने गोंधळ झाल्याची स्थिती आहे. त्यात चालू वर्षी भांडवल नसताना वाढीव मजुरी द्यावी लागत आहे. तर पदरमोड करून हंगाम पुढे न्यावा लागत आहे.

प्रामुख्याने अडचणी 

  • पोंगा अवस्थेतील बागांमध्ये डाउनीचा प्रादुर्भाव 
  • फुलोरा अवस्थेत बागांमध्ये गळकूज  
  • मुळी कुजल्यामुळे नवीन निघणारे घड अतिशय कमकुवत 
  • द्राक्षाच्या वेली एकसारख्या फुटण्यात अडचणी 
  • नुकसान वाढल्याने काही शेतकऱ्यांसमोर बागेवर कुऱ्हाड चालविण्याची वेळ 
  • दव पडल्याने घड कुजण्याची समस्या
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com