agriculture news in marathi Rains lashed the grape belt in Sangli district | Page 4 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले.

सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा फटका बसतो आहे. तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी पहाटे जोरदार पावसाने झोडपले.

जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, सावर्डे, आरवडे, डोंगरसोनी, मिरज तालुक्यातील एरंडोली, शिपूर परिसरात जोरदार पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, नागज परिसरातही पाऊस झाला.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख २५ हजार एकर आहे.

फळछाटणी अंतिम टप्प्यात आली आहे. आगप फळछाटणी २५ ते ३० हजार एकर क्षेत्रावरील बागा सध्या फुलोरावस्थेत आहेत. या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. पोंगा, फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना फटका बसणार आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे इतर भागांत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी फवारणी करू लागले आहेत. वातावरण असेच राहिले तर डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय...कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार...
Big Breaking - बैलगाडा शर्यतींना...नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील बैलगाडा...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय...शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख...