पावसाने सिंधुदुर्गाला झोडपले

परतीच्या पावसाने रविवारी (ता. ११) सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला अक्षरक्षः झोडपून काढले. काही भागात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली.
Rains lashed Sindhudurg
Rains lashed Sindhudurg

सिंधुदुर्ग ः परतीच्या पावसाने रविवारी (ता. ११) सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला अक्षरक्षः झोडपून काढले. काही भागात तर ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यांना नदीनाल्याचे रूप प्राप्त झाले होते. या पावसामुळे भातपिकांचे नुकसान झाले आहे. भातखाचरामध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. त्यामुळे भातकापणीतही खंड पडला आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडत होता. परंतु वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्याच्या काही भागाला पावसाने झोडपून काढले. तब्बल तीन तास अतिवृष्टी सुरू होती. ढगफुटीसारख्या या पावसामुळे रस्त्यावरून नदीनाल्यांसारखे पाणी वाहत होते. अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले.

कासार्डे, खांबाळे या भागात ढगफुटीसारखा पाऊस झाला. कासार्डे येथील एका मंदिरात तीन फूट पाणी शिरले. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेल्या भातशेती मोठे नुकसान झाले. अनेक भागातील भातशेती भुईसपाट झाली आहे. भातखाचरामध्ये दीड ते दोन फूट साचले होते. पावसाने उभी पिके आडवी झाली असून त्यावर पाणी साचले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com