Agriculture news in Marathi Rains likely in the state from tomorrow | Page 2 ||| Agrowon

राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्य

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता. १६) पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता. १६) पुन्हा उघडीप देण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १५) कोकणात बहुतांशी ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, दिसा, अहमदाबाद, इंदूरपर्यंतचे तीव्र कमी दाब क्षेत्र, ओडिशा, गोपाळपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत आहे. 

वादळी प्रणालीची तीव्रता ओसरली
ओडिशाच्या किनारपट्टीलगत जमिनीवर आल्यानंतर वादळी प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली आहे. छत्तीसगड आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यालगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. ही प्रणाली मध्य प्रदेशकडे सरकत असताना निवळत जाणार आहे. गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. आज (ता. १५) कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...