मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला

मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला
मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरला

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२ पैकी १७३ मंडळांत शुक्रवारी (ता. २७) पावसाची हजेरी लागली. परंतु गत दोन ते तीन दिवसांच्या तुलनेत पावसातील जोर कमीच होता. तुरळक, हलका, तर मोजक्‍या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५० मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. औरंगाबाद मंडळात ३१ मिलिमीटर, उस्मानपुरा २३, भावसिंगपुरा ३५, कांचनवाडी २७, अंबाई ३७, अमठाणा २५, खंडाळा २२, शिवूर २१, लोणी ३२, बोरसर २६, गंगापूर ३२, वाळूज २४, मांजरी २५, सिद्धनाथ वडगाव २०, कन्नड २९, पिशोर २०, तर सुलतानपुरात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ १४ मंडळांत तुरळक पाऊस झाला. भोकरदन, परतूर तालुक्‍यासह बदनापूर तालुक्‍यातील बहुतांश मंडळांत पावसाचा थेंब पडला नाही. वरूड मंडळातील २० मिलिमीटर वगळता उर्वरित मंडळांत १ ते १४ मिलिमीटर पाऊस झाला. 

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३६ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. दिंद्रूड मंडळातील २२ मिलिमीटर वगळता उर्वरित मंडळांत १ ते १६ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ४० मंडळांत पावसाची हजेरी लागली. रेणापूर मंडळात ४० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित मंडळांत १ ते १६ मिलिमीटर पाऊस झाला.  उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३३ मंडळांत पाऊस झाला.

इतरत्र तो बहुतांश मंडळांत तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा राहिला. तुळजापूर मंडळात २४ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण मंडळात २१ मिलिमीटर, येरमाळा मंडळात २३ मिलिमीटर पाऊस झाला. एकूण ७६ पैकी केवळ ५ तालुक्‍यात वार्षिक सरासरीच्या अपेक्षेनुरूप पाऊस झाला. हिंगोलीतील वसमत, बीडमधील शिरूर कासार, अंबाजोगाई, केज, लातूरमधील लातूर व औसा, उस्मानाबादमधील भूम व परंडा या अजूनही ५० टक्‍केही पाऊस नाही. मराठवाड्यात २७ सप्टेंबरपर्यंत ६६९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत केवळ ५४७ मिलिमीटर पाऊस झाला. 

परतीच्या पावसावर भिस्त

फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर या औरंगाबाद जिल्ह्यांतील तालुक्‍यांसह नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार, लोहा या तालुक्‍यात आजवर अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला. उर्वरित ६९ तालुक्‍यांत मात्र आजपर्यंत अपेक्षित पावसाची सरासरीही पावसाने गाठली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता सारी भिस्त परतीच्या पावसावर अवलंबून असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com