Agriculture news in marathi Rains in Parbhani, Nanded and Hingoli hamper cotton procurement | Agrowon

परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस खरेदीत अडथळे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020


सोमवारी (ता.१) संदेश आल्यानंतर मंगळवारी (ता.२) बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस आणला. दिवसभर थांबूनही मोजमाप झाले नाही. रात्री पावसात थांबावे लागले. बुधवारी (ता.३) दुपारपर्यंत मोजमाप झालेले नाही. 
-अर्जुन मोरे, तामसवाडी. 

परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे शासकीय केंद्रावर कापूस खरेदीसाठी अडथळे येते आहेत. मोजमाप न झालेली वाहने केंद्राबाहेर तसेच मार्केट यार्डात उभी असल्यामुळे पावसात कापूस भिजून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या तीन जिल्ह्यांतील ५० हजारांहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. 

परभणी जिल्ह्यात ऑनलाइन आणि ऑफलान नोंदणीकृत ४१ हजार २१ शेतकऱ्यांपैकी मंगळवार (ता.२) पर्यंत पणन महासंघाच्या ४ केंद्रावर ५ हजार ४३८ शेतकऱ्यांचा १ लाख ७४ हजार ७८८ क्विंटल आणि सीसीआयच्या ६ केंद्रांवर ५ हजार २९७ शेतकऱ्यांचा १ लाख ४४ हजार ५४६ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अजून ३० हजार ४८६ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे. 

सोमवारी (ता.१) एसएमएस केल्यामुळे अनेक केंद्रावर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला. परंतु, मंगळवारी (ता.२) दुपारनंतर पाऊस आल्यामुळे खरेदी थांबवावी लागली. त्यामुळे केंद्रावर तसेच मार्केट यार्डात बुधवारी (ता.३) दुपारपर्यंत वाहने उभी होती. भाड्याचा भुर्दंड तसेच पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 

नांदेड जिल्ह्यातील ८ केंद्रांवर मंगळवार (ता.१) पर्यंत ७ हजार ५६ शेतकऱ्यांचा १ लाख ४२ हजार ७५८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. अजून २१ हजार १०३ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन केंद्रांवर ९४१ शेतकऱ्यांचा १९ हजार ७०९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर, ९०० हून अधिक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी बाकी आहे. सीसीआय आणि पणन महासंघाने पावसामुळे खरेदी बंद करत असल्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मोजमाप शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
 


इतर बातम्या
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...