agriculture news in marathi Rains receded in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत शुक्रवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत शुक्रवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. बहुतांश भागात आकाशात ढगांची गर्दी कायम आहे. नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. याशिवाय अतिवृष्टीने केलेले नुकसानही आता दिसण्यास पडणे सुरू झाले आहे. 

मराठवाड्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाने चांगलेच धुमशान केले. जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यातील जवळपास ७७ मंडळांत अतिवृष्टी झाली होती. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मात्र नांदेड जिल्ह्यात सरासरी २९.२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, नायगाव खु., हिंमायतनगर आदी तालुक्‍यांत पावसाचे धुमशान पाहायला मिळाले. धर्माबाद तालुक्‍यात सरासरी ८७.७ मि.मी, बिलोली ६०.३ मि.मी, हिमायतनगर ५५.४ मि.मी, नायगाव खु. ४५.२ मि.मी, उमरी ३२.३ मि.मी, मुदखेड ३७.९ मि.मी, देगलूर ३१ मि.मी, नांदेड २९.६ मि.मी, किनवट २१.९ मि.मी, लोहा २५.७ मि.मी, भोकरमध्ये सरासरी २०.३ मि.मी पावसाची नोंद झाली. 

नांदेड जिल्ह्यातील इतर तालुक्‍यात सरासरी ३ ते १७ मि.मी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यात झालेला सरासरी ११.४ मि.मी पाऊस वगळता इतर तालुक्‍यात सरासरी ३.८ ते ८.२ मि.मी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात धारूर वगळता सर्वच तालुक्‍यात हलका पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यात ढगांची गर्दी 

गंगापूर, वैजापूर, तालुक्‍यात पावसाची नोंद झाली नाही. इतर तालुक्‍यात मात्र सरासरी ०.१ ते ४.६ मिलिमिटर दरम्यान पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत सरासरी ०.२ ते ८.३ मि.मी दरम्यान पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...